Neeraj Chopra Dainik Gomantak
क्रीडा

Neeraj Chopra: नवीन वर्षात गोल्डन बॉयसमोर असणार 'हे' लक्ष्य

निरज चोप्राने येत्या वर्षात त्याच्यासमोर काय लक्ष्य असणार आहे, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Neeraj Chopra: भारताला ऍथलेटिक्समध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारा निरज चोप्रा आता पुढील यशस्वी वाटचालीसाठी तयारी करत आहे. 24 वर्षीय निरजने आता त्याच्यासमोर काही लक्ष्यही ठेवली आहेत.

निरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर त्याने गेल्यावर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक आणि डायमंड लीग फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचीही कामगिरी केली होती. मात्र, अद्याप तो 90 मीटर भालाफेक करू शकलेला नाही. पण आता त्याने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

त्याने स्टॉकहोममध्ये पार पडलेल्या डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर भालाफेक केला होता. मात्र तो 90 मीटरचा जादूई आकडा पार करू शकला नव्हता.

त्याने व्हिडिओद्वारे साधलेल्या संवादादरम्यान सांगितले की 'या नवीन वर्षात मला आशा आहे की मी या प्रश्नाला मार्गी लावेल. मी जर काही सेंटीमीटरने माझा पाय पुढे टाकला असता, तर मी यापूर्वी अशी कामगिरी केली असती.'

'केवळ 6 सेंटीमीटरने 90 मीटर हुकले. कोणत्याही खेळाडूसाठी हा जादूई आकडा असतो. तुम्ही कोणत्याही अव्वल क्रमांकांवरील खेळाडूंबद्दल चर्चा करता तेव्हा म्हणता की त्याने 90 मीटर पार केले आहे.'

पण याबरोबरच या गोष्टीचा त्याच्यावर दबाव नसल्याचेही निरजने सांगितले. तो म्हणाला, 'पण मी अपेक्षांचा दबाव घेत नाही. ज्यावेळी ते व्हायचे आहे, तेव्हा होईल. गेल्यावर्षी किंवा त्याच्याआधीच्या वर्षीही हे होऊ शकले असते. पण कदाचीत देवाने योग्य वेळ आणि ठिकाण यासाठी ठरवले असेल.'

नीरज पुढे म्हणाला, 'मी अपेक्षांचा फार विचार करत नाही. तुम्हाला स्वत:च्या आणि इतरांच्या अपेक्षा सांभाळाव्या लागतात. पण मी जेव्हा स्पर्धा खेळत असतो, त्यावळी माझे मन पूर्णपणे मोकळे असते. त्यावेळी फक्त तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे असते.'

'त्याच दिवसासाठी तुम्ही तयारी केली आहे, असा विचार करून खेळायचे असते. ज्या लोकांना मला खेळताना पाहायला आवडते, त्यांच्या अपेक्षा माझ्यासाठी सकारात्मकरित्या काम करतात.'

दरम्यान, 2024 साली पॅरिसला ऑलिम्पिक होणार आहे. पण त्याआधी त्याने यावर्षी तो कोणकोणत्या महत्त्वाच्या स्पर्धांवर लक्ष्य केंद्रीत करणार आहे, हे त्याने सांगितले आहे.

तो म्हणाला, 'यावर्षी माझ्यासमोर वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन गेम्स आणि डायमंड लीग फायनल या तीन मोठ्या स्पर्धा आहेत. पण की कधी सरावाला सुरुवात करेल, याबद्दल सध्या विचार केलेला नाही. मी माझ्या प्रशिक्षकांबरोबर चीनमधील परिस्थितीचा आढावा घेऊन योजना आखेल.'

दरम्यान निरजने भारतीय ऍथलेटिक्सला भविष्यात चांगले दिवस येतील असा विश्वासही व्यत्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: 8 चौकार, 3 षटकार! गोव्याच्या 'तनिषा'ची वादळी खेळी व्यर्थ; आंध्र प्रदेशचा 18 धावांनी विजय

Goa News: 28 गुन्ह्यांचे अपराधीकरण झाले रद्द! गोवा राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; तुरुंगवासाऐवजी दंडाची तरतूद

Nagarjuna At IFFI 2025: '..अजूनही देशात शिवा म्हणूनच हाक मारतात'! अभिनेते नागार्जुन यांचा दिलखुलास संवाद; उलगडला भावनिक प्रवास

मित्र मित्र गेले पोहायला, पाण्याचा अंदाज न आल्याने ओढवले संकट; दूधसागर नदीत बुडालेल्या 15 वर्षीय मुलाचा सापडला मृतदेह

Horoscope: प्रवास, संधी आणि नवीन दिशा! विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम; व्यवसायिक लाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT