Natwest Series 2002 Final Dainik Gomantak
क्रीडा

NatWest Series 2002: फ्लॅशबॅक! युवी-कैफची भागीदारी, झहीरचे विनिंग रन अन् लॉर्ड्सवरील गांगुलीची 'दादागिरी'

Sourav Ganguly lords Celebration: लॉर्ड्सवरील गांगुलीच्या शर्टलेस सेलिब्रेशनला 21 वर्षे पूर्ण झाली आहे, वाचा भारताच्या त्या अविस्मरणीय विजयाही कहाणी

Pranali Kodre

NatWest Series 2002, Sourav Ganguly Shirtless Celebration at Lords balcony:

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 13 जुलै हा दिवस खास आहे. याच दिवशी 21 वर्षांपूर्वी भारतीय संघाने एक अविश्वसणीय विजय मिळवला होता. याचदिवशी सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट काढून विजयाचं आयकॉनिक सेलिब्रेशन केले होते.

ट्रेस्कोथिक-हुसेनची शतके

ही गोष्ट आहे 13 जुलै 2002 रोजी झालेल्या नेटवेस्ट सिरिजमधील अंतिम सामन्याची. भारत आणि इंग्लंड संघात क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानात सामना झाला होता. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार नासिर हुसेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

इंग्लंड संघाने या निर्णयाचा फायदा घेत प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 325 धावांचा डोंगरही उभारला होता. इंग्लंडकडून मार्कस ट्रेस्कोथिक आणि नासिर हुसेनने शतकेही साजरी केली होती. ट्रेस्कोथिकने 100 चेंडूत 109 धावांची खेळी केली होती. तसेच हुसेनने 128 चेंडूत 115 धावांची खेळी केली होती. याशिवाय अँड्र्यु फ्लिंटॉफने ४० धावांची खेळी केली होती. भारताकडून झहिर खानने 3 विकेट्स घेतल्या होत्या.

गांगुली - सेहवागची शतकी सलामी

दरम्यान, त्यावेळी 300 च्या वरील धावा हे आव्हान भलेमोठे मानले जायचे. त्यामुळे भारतासमेर 326 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याचे आव्हान होते. पण भारताकडून सलामीला कर्णधार सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवागने चांगली सुरुवात केली होती. विशेष म्हणजे सेहवागपेक्षा गांगुली आक्रमक खेळत होता. या दोघांनी सलामीला 106 धावांची भागीदाही केली.

पण गांगुली 43 चेंडूत 60 धावांवर बाद झाला. पाठोपाठो सेहवाग 49 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. त्यानंतरही भारताने दिनेश मोंगिया (9), सचिन तेंडुलकर (14) आणि राहुल द्रविड (5) यांच्या विकेट्स झटपट गमावल्या. त्यामुळे भारताची अवस्था 146 धावांवर 5 विकेट्स अशी झाली होती.

युवी-कैफची शतकी भागीदारी

मुख्य फलंदाज बाद झालेले होते. पण याच परिस्थितीत भारताचा डाव सांभाळला तो संघात युवा असलेल्या मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांनी या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना मोठे यश मिळू न देता काही आक्रमक शॉट्स खेळत 6 व्या विकेटसाठी तब्बल 120 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.

यादरम्यान दोघांनी अर्धशतके केली. पण 42 व्या षटकात युवराजला पॉल कॉलिंगवूडने बाद केले. युवराज 63 चेंडूत 69 धावा करून बाद झाला. त्यावेळीही भारताला विजयासाठी 50 हून अधिक धावांची गरज होती.

कैफची अफलातून खेळी अन् झहीरच्या विजयी धावा

नंतर कैफने जबाबदारी खांद्यावर घेत आधी हरभजन सिंगला मदतीला घेतले. त्यांच्यात 47 धावांची भागीदारी झाली. पण 48 व्या षटकात फ्लिंटॉफने भारताला मोठा धक्का दिला. त्याने हरभजनला 15 धावांवर आणि अनिल कुंबळेला शुन्यावरच बाद केले. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता.

अखेरच्या दोन षटकात भारताला 11 धावांची गरज होती. तसेच इंग्लंडला केनळ दोन विकेट्सची गरज होती. पण यावेळी कैफ एका बाजूने फलंदाजी करत होता, त्याला झहीरने चांगली साथ दिली. या दोघांनी 49 व्या षटकात 9 धावा काढल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात केवळ २ धावांची भारताला गरज होती.

पण हे षटक फ्लिंटॉफ टाकत होता आणि स्ट्राईकला झहीर होता. झहीरला पहिस्या दोन चेंडूवर एकही धाव घेता आली नव्हती. पण तिसऱ्या चेंडूवर झहिरने शॉट खेळला आणि कैफबरोबर तो दोन धावा धावला. त्यामुळे भारताने रोमांचक अंतिम सामन्यात विजय तर मिळवलाच पण नेटवेस्ट सिरिजवर कब्जाही केला.

या सामन्यात कैफ 75 चेंडूत 87 धावा करून नाबाद राहिला, तर झहीरही 7 चेंडूत 4 धावांवर नाबाद रहिला. कैफला सामनावीर पुरस्कारही मिळाला.

गांगुलीचं सेलिब्रेशन

झहिरने विजयी धाव घेताच लॉर्ड्सच्या बाल्कनीत भारतीय संघाने जोरदार जल्लोष केला. याचदरम्यान त्यावेळी भारताचा कर्णधार असलेल्या गांगुलीने टी-शर्ट काढून तो एका हाताने फिरवत सेलिब्रेशन केले होते. त्याच्या या सेलिब्रेशनची आजही चर्चा होते.

दरम्यान, या सेलिब्रेशनला एक पार्श्वभूमी होती. यासामन्याच्या काही दिवसांपूर्वीच इंग्लंडच्या विजयाचे सेलिब्रेशन करताना फ्लिंटॉफने वानखेडे स्टेडिवर टी-शर्ट काढून सेलिब्रेशन केले होते. त्याच सेलिब्रेशनला प्रत्युत्तर देताना गांगुलीनेही लॉर्ड्सवर अशा प्रकारे सेलिब्रेशन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT