MS Dhoni meet Mohammad Kaif: सर्जरीनंतर धोनीची कैफ फॅमिलीशी 'ग्रेट भेट'! जुन्या मित्राच्या मुलाला 'ती' गोष्ट सांगत केले खूश

एमएस धोनीची गुडघ्यावरील सर्जरीनंतर मोहम्मद कैफबरोबर भेट झाली होती, या भेटीदरम्यानचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
MS Dhoni meet Mohammad Kaif
MS Dhoni meet Mohammad KaifDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni meet Mohammad Kaif: गेल्याच आठवड्यात म्हणजे 30 मेच्या मध्यरात्री एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. पण यानंतर धोनीच्या डाव्या गुडघ्याची मुंबईत शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले होते. आता या शस्त्रक्रियेनंतर धोनी त्याच्या घरी परतला आहे.

दरम्यान, धोनी घरी परतत असताना त्याची विमानतळावर अचानक माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफशी भेट झाली. या भेटीदरम्यानचे फोटो कैफने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे फोटो शेअर करताना कैफने कॅप्शनमध्ये धोनी शस्त्रक्रियेनंतर घरी जात असल्याची माहिती दिली. तसेच त्याने असेही सांगितले की त्याचा मुलगा कबीर धोनीला भेटून खूश झाला.

MS Dhoni meet Mohammad Kaif
MS Dhoni tips to KS Bharat: WTC फायनलसाठी केएस भरतला धोनीने काय दिल्या टीप्स? स्वत:च केलाय खुलासा

कैफने जे दोन फोटो 5 जून रोजी शेअर केले आहेत, त्यातील एका फोटोत कैफबरोबर त्याची पत्नी पूजा आणि मुलगा कबीर आहे. तसेच त्यांच्याबरोबर एमएस धोनी त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा देखील दिसत आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये कैफचा मुलगा कबीर आणि धोनी आहेत.

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये कैफने लिहिले की 'आज आम्ही एका महान व्यक्तीला आणि कुटुंबाला विमानतळावर भेटलो. तो शस्त्रक्रियेनंतर त्याच्या घरी परत जात होता. मुलगा कबीर खूप आनंदी होता कारण धोनीने त्याला सांगितले की त्याच्यासारखेच लहान असताना त्यालाही फुटबॉल खेळायला आवडायचे. लवकर बरा हो आणि तुला पुढच्या हंगामात खेळताना पाहायचे आहे.'

दरम्यान, धोनी आणि कैफ चांगले मित्र देखील असून त्यांनी भारताकडून एकत्र क्रिकेटही खेळले आहे.

MS Dhoni meet Mohammad Kaif
MS Dhoni's Daughter Viral Photo: 'देव बाप्पा प्लिज...', IPL फायनलवेळी माहीच्या लेकीचा तो फोटो व्हायरल...पाहून तुम्हीही म्हणाला...

धोनी आयपीएल 2023 च्या संपूर्ण हंगामात डाव्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळे त्याने हा हंगाम संपल्यनंतर लगेचच त्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याच्या गुडघ्यावर मुंबईतील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर दिनशॉ परदीवाला यांनी शस्त्रक्रिया केली.

दरम्यान, आयपीएल 2023 धोनीचा अखेरचा हंगाम असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण अंतिम सामन्यानंतर धोनीने तो पुढील हंगामही खेळू शकतो, असे सांगितले आहे. त्यामुळे त्याचे चाहते खूश झाले आहेत.

धोनीने आयपीएल 2023 मध्ये खालच्या फळीत खेळताना 16 सामन्यांमध्ये 182.46 च्या स्ट्राईक रेटने 104 धावा केल्या. यामध्ये तो 8 वेळा नाबादही राहिला. त्याने या हंगामात एकूण 10 षटकार मारले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com