भाव्या सचदेव, हर्षिता जयराम Dainik Gomantak
क्रीडा

National Games 2023: जलतरणात कुशाग्र, भाव्या, हर्षिताचे स्पर्धा विक्रम

किशोर पेटकर

National Games Goa 2023: कांपाल येथील तलावात ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणात सोमवारी दिल्लीच्या कुशाग्र रावत व भाव्या सचदेव यांनी, तसेच केरळची हर्षिता जयराम यांनी स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.

कुशाग्र याने १५ मिनिटे ३८.७३ सेकंद वेळेसह पुरुषांच्या १५०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदक जिंकताना अद्वैत पागे (१५ मिनिटे ५४.७९ सेकंद) याने गतवर्षी गुजरातमधील ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नोंदविलेला विक्रम मोडला.

सोमवारी कुशाग्र याने ऑलिंपियन साजन प्रकाश याला मागे टाकले. केरळच्या जलतरणपटूला १५ मिनिटे ५७.१० सेकंद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अद्वैत पागे याला (१६ मिनिटे ०४.१३ सेकंद) याला ब्राँझपदक मिळाले.

दिल्लीच्या भाव्या हिने महिलांच्या ८०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये ९ मिनिटे ०८.६० सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. तिने गतवर्षी नोंदविलेला आपलाच ९ मिनिटे १५.२४ सेकंद वेळेचा विक्रम मोडला.

तेलंगणाच्या वृत्ती अगरवाल (९ः१४.५८ सेकंद) हिला रौप्य, तर कर्नाटकची शिरिन (९ः२९.०८ सेकंद) हिला ब्राँझपदक मिळाले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सातव्यांदा सहभागी झालेली ४० वर्षीय मध्य प्रदेशची अनुभवी रिचा मिश्रा (९ः४८.१७ सेकंद) हिला पाचवा क्रमांक मिळाला.

केरळच्या हर्षिता जयराम हिने २ मिनिटे ४०.६२ सेकंद वेळेसह नवा स्पर्धा विक्रम नोंदवून महिलांच्या २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. कर्नाटकच्या ए. के. लिनेशा (२ः४१.६४ सेकंद) हिला रौप्य, तर कर्नाटकचीच एस. लक्ष्या (२ः४१.६४ सेकंद) हिला ब्राँझपदक मिळाले.

गोव्याचा महिला संघ अंतिम फेरीत

महिलांच्या ४ बाय १०० मीटर मेडली रिलेत गोव्याच्या संघाने अंतिम फेरी गाठली. निरंजनी बोर्डे, श्रीजा गाड, अलाका ब्रिटो व सौरभी नाईक यांनी जोरदार प्रयत्न केले, पण त्यांना ४ मिनिटे ५४.५६ सेकंद वेळेसह आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

काल गोव्याच्या महिलांनी ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिलेतही अंतिम फेरी गाठली होती. सौरभी नाईक, पूजा राऊळ, आरोही बोर्डे, अलाका ब्रिटो यांच्या संघाने ४ मिनिटे २४.३३ सेकंद वेळेसह सातवा क्रमांक पटकावला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT