ज्योती यर्राजी प्रियांका गोस्वामी तेजस शिरसे Dainik Gomantak
क्रीडा

National Games 2023: अडथळा शर्यतीत आंध्रप्रदेशच्या ज्योतीला स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक

महाराष्ट्राच्या तेजस शिरसे याचीही वेगवान वेळ

किशोर पेटकर

National Games Goa 2023: हांग् चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या आंध्र प्रदेशच्या ज्योती यर्राजी हिने स्पर्धा विक्रमासह ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी संध्याकाळी सुवर्णपदक जिंकले.

तिने महिलांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत आपलाच विक्रम मोडताना १३.२२ सेकंद वेळ नोंदविली.

बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या प्रियांका गोस्वामी हिने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.

पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे याने स्पर्धा विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले.

ज्योतीने गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १३.३० सेकंद वेळ नोंदविली होती. यावर्षी बँकॉक येथील आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत ज्योतीने १३.०९ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. १२.७८ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रमही तिच्याच नावावर आहे.

चेंगडू येथे यावर्षी ऑगस्टमध्ये तिने ही वेळ नोंदविली होती. हांग् चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकताना ज्योतीने १२.९१ सेकंद वेळ नोंदविली होती.

सोमवारी ज्योतीमागोमाग रौप्यपदक जिंकताना तमिळनाडूच्या नित्या रामराज हिने १३.३६ सेकंद, तर ब्राँझपदक विजेत्या झारखंडच्या सपना कुमारी हिने १३.४२ सेकंद वेळ नोंदविली.

महाराष्ट्राच्या तेजसचीही वेगवान वेळ

पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे याने स्पर्धा विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले. सकाळच्या सत्रातील हिट्समध्ये त्याने १३.८० सेकंद वेळ नोंदवून २०१५ साली केरळमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सिद्धांत थिंगालाया याने नोंदविलेला विक्रम मोडला होता.

संध्याकाळी अंतिम फेरीत तेजसने स्वतःचाच विक्रम मोडताना १३.७१ सेकंद अशी आणखी वेगवान वेळ नोंदविली. ओडिशाच्या ए. ग्रेससन जीवा (१४.१३ सेकंद) याला रौप्य, तर राजस्थानच्या माधवेंद्र सिंग (१४.१९ सेकंद) याला ब्राँझपदक मिळाले.

प्रियांका गोस्वामीचा राष्ट्रीय विक्रम

उत्तर प्रदेशच्या प्रियांका गोस्वामी हिने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. प्रियांकाने १ तास ३६.३५ सेकंद अशी वेळ नोंदविली. तिने ब्राँझपदक मिळविलेल्या मुनिता प्रजापती हिचा विक्रम मोडला.

मुनिताने गतवर्षी गुजरातमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १ तास ३८.२० सेकंद वेळ नोंदविली होती. महाराष्ट्राच्या सेजल सिंग हिने १.४१.१३ सेकंद अशा वेळेसह रौप्यपदक मिळविले.

पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत उत्तराखंडच्या सूरज पवार याने १ तास २७.४३ सेकंदासह सुवर्ण जिंकले. सेनादल क्रीडा नियामक मंडळाच्या सर्विन याने १.४१.१३ सेकंदसह रौप्य तर हरियाणाच्या हरदीप याने १.४२.२४ सेकंद वेळेसह ब्राँझपदक जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT