National Archery: Archers Archit, Pushit, Sanjeel and Ridhan and their trainer.
National Archery: Archers Archit, Pushit, Sanjeel and Ridhan and their trainer. Dainik Gomantak
क्रीडा

National Archery: पणजीतील झिटो आर्चरीचे यश

दैनिक गोमंतक

पणजीः राष्ट्रीय तिरंदाजी (National Archery) स्पर्धेत झिटो आर्चरीच्या (Zito Archery) तिरंदाजांनी यश संपादन केले. अखिल भारतीय फिल्ड आर्चरी संघटनेने (All India Field Archery Association) ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेतली होती. तीन रौप्य आणि एका ब्राँझपदकाची कमाई झिटोच्या तिरंदाजांनी केली. १० व १४ वर्षांखालील गटात अर्चित जोशी व पुशीत जोशी यांनी, तर १७ वर्षांखालील गटात सांजेल फेरांव हिने रौप्य पदक पटकावले. ९ वर्षांखालील गटात रिधान गोईलने ब्राँझपदक मिळवले.

१६ राज्यांमधील ३०० तिरंदाजांनी भाग घेतला. चारही विजयी स्पर्धक डॉन बॉस्को ऑरेटरीच्या (Don Bosco Oratory) झिटो आर्चरी क्लबमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. कोरोना विषाणू महामारीमुळे क्लबमध्ये सरावाला येणे शक्य नसूनही त्यांनी मिळवलेल्या यशाचा आम्हाला मोठा अभिमान वाटत आहे, असे झिटो आर्चरीचे संस्थापक झिटो गुदिन्हो यांनी सांगितले. १५ ऑगस्टला महापौर चषक स्पर्धा होईल, असे त्यांनी पुढे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT