England Dainik Gomantak
क्रीडा

अॅशेस मालिकेसाठी माजी कर्णधाराने दिली इंग्लंडला विजयाची 'त्रिसूत्री'

दैनिक गोमन्तक

इंग्लंडला (England) अॅशेसचे (Ashes) जेतेपद मिळवण्याची आकांक्षा आहे. कारण त्याने मागील दोन मालिका गमावल्या आहेत. आता अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला (Australia) त्याच्याच घरच्या मैदानावर पराभूत करुन त्याने मालिका जिंकली तर यापेक्षा मोठी गोष्ट ती कोणती असेल. माजी इंग्लिश कर्णधार नासिर हुसेन (Nasir Hussein) देखील इंग्लंड संघाला ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा करण्यास सांगितले आहे. सध्याचा कर्णधार जो रुटसाठी अॅशेस जिंकण्यासाठी त्याने 3-पॉइंटचा फॉर्म्युला आणला आहे. त्याचबरोबर रुटने हा फॉर्म्युला वापरुन पाहावा असेही त्याने सांगितले.

दरम्यान, डेली मेलमध्ये लिहिलेल्या लेखात नासिर हुसैन यांनी अॅशेस जिंकण्यासाठी 3-पॉइंट फॉर्म्युला सांगितला आहे. त्याने लिहिले, “इंग्लंडला प्रथम चांगली सुरुवात करावी लागेल. ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्यासाठी संघाला पहिल्या डावात मोठी धावसंख्या करावी लागेल. त्याचबरोबर दुसऱ्याला डेव्हिड वॉर्नरला (David Warner) लवकरात लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठविण्यासाठी रणनीती आखावी लागेल. डेव्हिड वॉर्नरविरुद्ध या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांचा मोठा सामना होऊ शकतो, अशी कबुलीही नासरने दिली आहे. वॉर्नरला मोठी फटकेबाजी करण्यापासून रोखावे लागणार आहे. आणि तिसरे, बॉलसह प्लॅन बी हवा. याचा अर्थ असा की, जो रुटने खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार वेगवान गोलंदाजीत बदल करावा.''

नासिर हुसेन यांचा 3-पॉइंट फॉर्म्युला

प्रथम फलंदाजी करा आणि मोठी धावसंख्या उभारा

नासेर हुसैन यांनी आपल्या लेखात लिहिले आहे की, ब्रिस्बेनमध्ये नाणे फेकल्यापासून ऍशेसचे युद्ध सुरु होईल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो. पहिल्या डावात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडनेही प्रथम फलंदाजी करावी. नासेर हुसेनने नाणेफेक जिंकल्यानंतर जो रुटला प्रथम गोलंदाजी करण्यास मनाई केली आहे.

गोलंदाजीसाठी प्लॅन बी

जेम्स अँडरसनची पहिल्या कसोटीतून बाहेर पडणे हा संघासाठी मोठा धक्का आहे. अशा स्थितीत स्टुअर्ट ब्रॉडला पदभार स्वीकारावा लागेल. त्याने म्हटले की, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात जे केले ते इंग्लंडला करावे लागेल. इंग्लंडच्या गोलंदाजांना परिस्थितीचा फायदा घेत गोलंदाजी करावी लागेल.

वॉर्नर विरुद्ध इंग्लंड गोलंदाज

नासिर हुसेनच्या मते, ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ठ फलंदाज आहेत. परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांना डेव्हिड वॉर्नरवर मुसंडी मारावी लागेल. वॉर्नरने घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या 45 कसोटींमध्ये 63 प्लसच्या सरासरीने 4551 धावा केल्या आहेत. त्याने इंग्लंडविरुद्धच्या 23 कसोटीत 1615 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT