Narhar Thakur Goa Badminton Association Chairman Dainik Gomantak
क्रीडा

भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या उपाध्यक्षपदी गोव्याचे नरहर ठाकूर

राष्ट्रीय संघटनेच्या शुक्रवारी आसाममधील गुवाहाटी येथे झालेल्या आमसभेत निवड

दैनिक गोमन्तक

पणजी ः गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांची भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या (बीएआय) उपाध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रीय संघटनेचे आमसभा शुक्रवारी आसाममधील गुवाहाटी येथे झाली. त्यावेळी 2022 ते 2026 या कालावधीसाठी कार्यकारी मंडळ निवडण्यात आले.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांची सलग दुसऱ्यांदा भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. 2017 साली त्यांनी राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. ते आशिया बॅडमिंटनचे उपाध्यक्ष, तर जागतिक बॅडमिंटन (Badminton) महासंघाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यही आहेत.

ज्युनियर राष्ट्रीय संघाचे माजी प्रशिक्षक संजय मिश्रा यांची भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या सचिवपदी निवड झाली, तर महाराष्ट्राचे अरूण लखानी खजिनदारपदी निवडून आले. राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक (Coach) पुल्लेला गोपीचंद यांचीही उपाध्यक्षपदी निवड झाली. नव्या कार्यकारी मंडळात अकरा उपाध्यक्ष, तर आठ संयुक्त सचिव आहेत.

भारतीय बॅडमिंटन संघटनेचे नवनियुक्त कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे:

अध्यक्ष : हिमंता बिस्वा सर्मा, उपाध्यक्ष : अब्दुल बारी सिद्दिकी, अजय कुमार, अंबुमणी रामदोस, नरहर ठाकूर, ओमा दत्त शर्मा, पुल्लेला गोपीचंद, रातू तेची, शेखरचंद्र बिश्वास, एस. मुरलीधरन, विराजसागर दास, वातीझुलू सुझुमेरेन जमीर, सचिव : संजय मिश्रा, खजिनदार : अरूण लखानी, संयुक्त सचिव : अनिल चौगुले, कोंडा प्रभाकर राव, के. के. शर्मा, मयूर पारीख, एन. श्यामकुमार सिंग, ओमर रशीद, पी. अनाकम्मा चौधरी, सुरिंदर महाजन, सदस्य : बी. एस. मनकोटी, बामांग तागो, एच. लाल्नुनसियामा, कृष्णानंद जैसवाल, निलीन कुमार, प्रदीप गंधे, पिनबियांग्लांग लालू, सुकांता दास, संजीब कुमार, व्ही. अरुणाचलम.

गोव्याचे (Goa) नरहर ठाकूर यांची भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या कार्यकारी मंडळात चौथ्यांदा निवड झाली आहे. यापूर्वी ते सदस्य होते, नंतर मागील सलग दोन टर्ममध्ये ते संयुक्त सचिवपदी होते. आता पहिल्यांदाच त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. 2012 साली लंडन ऑलिंपिकमध्ये त्यांनी भारतीय बॅडमिंटन संघाच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी पाहिली होती. याशिवाय ऑल इंग्लंड, जपान ओपन आदी प्रमुख आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांतही त्यांनी भारतीय संघाचे व्यवस्थापकपद भूषविले आहे. ते भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या विकास समितीचेही सदस्य आहेत. गोवा बॅडमिंटन संघटनेत त्यांनी विविध पदावर काम केले असून सध्या अध्यक्ष आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT