Charles Amini  Dainik Gomantak
क्रीडा

NAM vs PNG: पापुआ न्यू गिनीच्या स्टार फलंदाजाने मोडला अ‍ॅडम गिलख्रिस्टचा रेकॉर्ड

NAM vs PNG: भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी जोरात सुरु झाली आहे. नामिबियामध्ये अनेक संघ विश्वचषक पात्रता प्लेऑफ खेळत आहेत.

Manish Jadhav

NAM vs PNG: भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी जोरात सुरु झाली आहे. नामिबियामध्ये अनेक संघ विश्वचषक पात्रता प्लेऑफ खेळत आहेत. हे सामने विश्वचषकापासून दोन पावले दूर मानले जातात. नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी (पीएनजी) यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात 382 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पीएनजीचा फलंदाज चार्ल्स अमिनीने शानदार फलंदाजी केली.

दरम्यान, चार्ल्सने अवघ्या 66 चेंडूत शतक झळकावले. सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या या फलंदाजाने 75 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकार मारले आणि 145.33 च्या स्ट्राईक रेटने 109 धावा केल्या. तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नसला तरी या झंझावाती खेळीने त्याने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अ‍ॅडम गिलख्रिस्टचा विक्रम मोडीत काढला.

अ‍ॅडम गिलख्रिस्टचा विक्रम मोडला

चार्ल्स अमिनी पापुआ न्यू गिनीचा सर्वात जलद शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. त्याचबरोबर जगभरातील क्रिकेटपटूंमध्ये त्याने या बाबतीत अ‍ॅडम गिलख्रिस्टला मागे टाकले आहे. गिलख्रिस्टने 67 चेंडूत शतक झळकावले होते. 72, 73 आणि 78 चेंडूत शतके ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

दरम्यान, चार्ल्सने गिलख्रिस्ट तसेच कॅनडाचा स्टार फलंदाज जॉन डेव्हिडसन, पाकिस्तानचा बासित अली आणि न्यूझीलंडचा फलंदाज क्रेग मॅकमिलन यांना मागे टाकले. या सर्व फलंदाजांनी 67 चेंडूत शतक झळकावले होते. त्याचवेळी, चार्ल्सने पाचव्या विकेटसाठी 153 धावांची भागीदारी केली. यासह पीएनजी संघाने वनडेत 333 ही सर्वोत्तम धावसंख्या केली.

नामिबियाने हा सामना 48 धावांनी जिंकला

मात्र, 382 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पीएनजी संघ 333 धावांत आटोपला. अशा प्रकारे नामिबियाने हा सामना 48 धावांनी जिंकला. नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर संघाला मोठा विजय मिळवून दिला. त्याने फलंदाजीत शानदार शतक झळकावून 125 धावा केल्या, तर गोलंदाजीत त्याने 2 बळी घेत पीएनजीची कंबर मोडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

SCROLL FOR NEXT