SA vs WI: दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात जॉन्सन चार्ल्सने झंझावाती शतक ठोकत इतिहास रचला.
वेस्ट इंडिजसाठी सर्वात जलद T20 शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत अनुभवी खेळाडू ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे.
चार्ल्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 39 चेंडूत शतक ठोकले, तर ख्रिस गेलने 47 चेंडूत वेस्ट इंडिजसाठी सर्वात वेगवान शतक ठोकले.
सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात जॉन्सन चार्ल्सने काइल मेयर्ससह दुसऱ्या विकेटसाठी 135 धावांची मोठी पाटर्नशिप केली.
चार्ल्सने 39 चेंडूत शतक पूर्ण केले आणि 46 चेंडूत 118 धावा केल्या. 118 धावांसह, त्याने सर्वात मोठे शतक करण्याच्या बाबतीत गेललाही मागे सोडले, गेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही (South Africa) 117 धावा केल्या.
एकूणच T20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याबाबत बोलायचे झाले तर जॉन्सन चार्ल्स आता चौथ्या क्रमांकावर आला आहे.
डेव्हिड मिलर, रोहित शर्मा (Rohit Sharma), एस विक्रमसेकेरा यांच्यानंतर आता जॉन्सन चार्ल्सचे नाव आहे. वेस्ट इंडिजसाठी एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत चार्ल्सने ख्रिस गेलचीही बरोबरी केली आहे. पहिल्या क्रमांकावर एविन लुईस आहे, ज्याने एका डावात 12 षटकार ठोकले आहेत.
35 – डेव्हिड मिलर, विरुद्ध बांगलादेश, पॉचेफस्ट्रूम, 2017
35 – रोहित शर्मा शर्मा, भारत विरुद्ध श्रीलंका, इंदूर, 2017
35 – एस विक्रमसेकेरा, झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्की, इल्फोव्ह काउंटी, 2019
39 – जॉन्सन चार्ल्स, वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, 2023
39 – एस पेरियालवार, रोमानिया विरुद्ध तुर्की, इल्फोव्ह काउंटी, 2019
39 – झीशान कुकीखेल, हंगेरी विरुद्ध ऑस्ट्रिया, लोअर ऑस्ट्रिया, 2022
12 – एविन लुईस विरुद्ध भारत, किंग्स्टन, 2017
11 – ख्रिस गेल विरुद्ध इंग्लंड, मुंबई, 2016
11- जॉन्सन चार्ल्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, आज
10 – ख्रिस गेल विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2007
125* (62) – एविन लुईस विरुद्ध भारत किंग्स्टन, 2017
118* (45) – जॉन्सन चार्ल्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, आज
117 (57) – ख्रिस गेल विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2007
107 (53) – रोव्हमन पॉवेल विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाउन, 2002
100* (48) – ख्रिस गेल विरुद्ध भारत, मुंबई, 2016
100 (49) – एविन लुईस विरुद्ध भारत, लॉडरहिल, 2016
जॉन्सन चार्ल्स हा यष्टिरक्षक फलंदाज आहे. त्याने 2011 साली इंग्लंडविरुद्ध पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. एक दशकाहून अधिक कालावधीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, तो आतापर्यंत केवळ 40 टी-20 सामने खेळू शकला आहे. यादरम्यान त्याने सुमारे 130 च्या स्ट्राइक रेटने 950 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने आपल्या T20 कारकिर्दीत 100 हून अधिक चौकार आणि 40 हून अधिक षटकार मारले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.