Sree Charani Dainik Gomantak
क्रीडा

ICC Womens T20 Ranking: 12 महिन्यांचा प्रवास अन् ऐतिहासिक शिखर! भारताची 21 वर्षीय एन श्री चरणी बनली जगातील नंबर-1 टी-20 गोलंदाज

Sree Charani Becomes No. 1 T20I Bowler: ताज्या आयसीसी क्रमवारीत श्री चरणी 753 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान झाली. तिने नंबर- 1 च्या शर्यतीत प्रदीर्घ काळापासून असलेल्या इंग्लंडच्या फिरकीपटूंचे वर्चस्व मोडून काढले.

Manish Jadhav

Sree Charani Becomes No. 1 T20I Bowler: इंग्लंडच्या भूमीवर सध्या 'आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026' चा थरार सुरु असून, या महाकुंभातील आपल्या फिरकीच्या जोरावर भारताच्या एका युवा गोलंदाजाने इतिहास रचला. आयसीसीने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारताची अवघ्या 21 वर्षांची डावखुरी ऑर्थोडॉक्स स्पिनर एन श्री चरणी जगातील नंबर-1 गोलंदाज बनली. आंध्र प्रदेशमधून आलेल्या श्री चरणीने इंग्लंडच्या लिनसे स्मिथला मागे टाकत हा ऐतिहासिक पराक्रम केला. अवघ्या 12 महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या युवा खेळाडूने मिळवलेले हे यश थक्क करणारे आहे.

ताज्या आयसीसी क्रमवारीत श्री चरणी 753 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान झाली. तिने नंबर- 1 च्या शर्यतीत प्रदीर्घ काळापासून असलेल्या इंग्लंडच्या फिरकीपटूंचे वर्चस्व मोडून काढले. श्री चरणी अव्वल स्थानी पोहोचली असली, तरी भारताची अनुभवी फिरकीपटू दिप्ती शर्मा हिला मोठा धक्का बसला. दिप्ती टॉप-5 मधून बाहेर पडत थेट आठव्या स्थानी (708 गुण) पोहोचली. सध्याच्या टॉप-5 क्रमवारीत श्री चरणीनंतर इंग्लंडची चार्ली डीन (733 गुण) दुसऱ्या, लिनसे स्मिथ (726 गुण) तिसऱ्या, सोफी एक्लेस्टोन (722 गुण) चौथ्या आणि पाकिस्तानची सादिया इक्बाल (714 गुण) पाचव्या स्थानी आहे.

एन श्री चरणी सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात आपल्या गोलंदाजीने कहर करत आहे. तिने अवघ्या 3 सामन्यांत सर्वाधिक 10 बळी घेत स्पर्धेत अव्वल स्थान राखले. तिने नेदरलँड्सविरुद्ध अवघ्या 12 धावा देत 4 बळी घेतले, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 फलंदाजांना तंबूत धाडले.

श्री चरणीच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात जितकी थरारक आहे तितकीच ती थक्क करणारी आहे. 2025च्या अखेरीस भारताच्या (India) भूमीवर खेळवल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच मोठ्या स्पर्धेत तिने 9 सामन्यांत 14 बळी घेतले होते आणि कर्णधारासाठी ती सर्वात मोठी 'पार्टनरशिप ब्रेकर' ठरली होती. आता टी-20 विश्वचषकातही तिच्या या जादुई फिरकीच्या जोरावर भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्याची मोठी जबाबदारी या नंबर-1 गोलंदाजावर असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT