ICC Ranking: सूर्यकुमार यादवने केला मोठा करिष्मा, T20 क्रमवारीत घेतली मोठी गगनभरारी

Latest ICC T20 Rankings: ऑस्ट्रेलियातील T20 विश्वचषक फेरीपूर्वी, मोहम्मद रिझवानचे 854 गुण आहेत.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak
Published on
Updated on

ICC T20 Ranking: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आणखी एका शानदार T20 मालिकेनंतर, टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानचा नंबर 1 फलंदाज मोहम्मद रिझवानच्या आणखी जवळ पोहोचला आहे. क्रमांक 1 आणि क्रमांक 2 च्या स्थानांमध्ये फक्त 16 गुणांचा फरक आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील T20 विश्वचषक फेरीपूर्वी, मोहम्मद रिझवानचे 854 गुण आहेत, तर सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत दोन अर्धशतके झळकावली आहेत. सूर्याचे 838 गुण आहेत. घरच्या मैदानावर त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Suryakumar Yadav
ICC ODI Rankings: न्यूझीलंडला मोठा धक्का, वनडे क्रमवारीत इंग्लंडचा वरचष्मा

सूर्यकुमार यादवने मोठा करिष्मा केला

2022 मध्ये सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) घरच्या मैदानावर T20 मालिका जिंकून आपली आश्चर्यकारक आघाडी कायम ठेवली. त्याने भारतासाठी 119 धावा केल्या. 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकादरम्यान सूर्याला क्रमवारीत अव्वल स्थानावर येण्याची संधी मिळू शकते.

दुसरीकडे, रिझवानने नुकतीच इंग्लंडविरुद्धची (England) सात सामन्यांची T20 मालिका 316 धावांसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून संपवली. पण वस्तुस्थिती अशी आहे की, या अनुभवी फलंदाजाला मालिकेतील सहाव्या सामन्यासाठी आणि लाहोरमधील मालिकेतील निर्णायक सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. ज्यामुळे त्याच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली.

Suryakumar Yadav
ICC ODI Batsmen Rankings: शुभमन गिलला बंपर फायदा, तर गब्बरला मोठा तोटा

T20 क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी केली

अव्वल स्थानाची शर्यत इतकी चुरशीची बनली आहे की, मंगळवारी इंदूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील अंतिम सामन्यात सूर्यकुमार आपल्या पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याला मोठ्या धावसंख्येसह पराभूत करु शकला असता, परंतु तो अवघ्या आठ धावांवर बाद झाला. पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार बाबर आझम फलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याला अव्वल स्थान मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण धावांची गरज आहे. तर जगभरातील इतर अनेक फलंदाजांनी ताज्या क्रमवारीत चांगली प्रगती केली आहे.

Suryakumar Yadav
ICC T20 Rankings: सूर्यकुमार यादव देतोय बाबर आझमला टक्कर

तसेच, भारताचा सलामीवीर केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांत 108 धावा करुन यादीत सात स्थानांनी झेप घेत 14 व्या स्थानावर पोहोचला आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक (आठ स्थानांनी वर 12 व्या स्थानावर), रिले रोसोव (23 स्थानांनी वरती 20 व्या स्थानावर) आणि डेव्हिड मिलर (10 स्थानांनी 29 व्या स्थानावर) देखील वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com