Mushfiqur Rahim Screengrab/FanCode
क्रीडा

BAN vs NZ, Video: मस्ती आली अंगाशी! बॉल हातानं आडवल्याने बांगलादेशी विकेटकिपर 'आऊट', वाचा नक्की प्रकरण काय

Mushfiqur Rahim: बांगलादेशचा विकेटकिपर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात हाताने चेंडू आडवल्याने बाद झाला.

Pranali Kodre

Mushfiqur Rahim dismissed after handling the ball during Bangladesh vs New Zealand 2nd Test at Dhaka:

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे बुधवारी सुरु झाला आहे. या सामन्यात एक नाट्यमय घटना घडली आहे. या सामन्यात चेंडू हाताळल्याने मुशफिकूर रहिम बाद झाला.

झाले असे की शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर चालू असलेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण 47 धावांवरच बांगलादेशने 4 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर मुशफिकूर आणि शहादत हुसेन यांनी डाव सावरत 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला होता.

मात्र, 41 व्या षटकात काईल जेमिसन गोलंदाजीला आला. यावेळी त्याने जेव्हा जेमिसनने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर मुशफिकुरने बचावात्मक शॉट खेळला. मात्र त्याच्या शॉटवर चेंडू वर उडला होता. पण हा चेंडू स्टंपच्या दिशेने जात नव्हता. परंतु, मुशफिकूरने हाताने तो चेंडू आडवण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंनी चेंडू हाताळल्याबद्दल अपील केले. यावेळी पंचांनी चर्चा केल्यानंतर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. रिप्लेमध्ये मुशफिकूर चेंडू जाणूनबुजून हाताने आडवताना दिसला. त्यामुळे पंचांनी त्याला बाद दिले.

त्यामुळे चेंडू हाताळल्याने बाद होणारा तो एकूण 11 वा खेळाडू ठरला. तसेच 22 वर्षांत अशाप्रकारे बाद होणारा पहिलाच खेळाडू ठरला यापूर्वी अखेरीस 2001 साली इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकल वॉन आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ असे बाद झाले होते. दरम्यान, चेंडू हाताळल्यामुळे बाद होणारा मुशफिकूर बांगलादेशचा पहिलाच खेळाडू ठरला.

काय सांगतो नियम

दरम्यान, क्रिकेटच्या नियमानुसार चेंडू हाताळण्यामुळे जाणारी विकेट ही मैदानात अडथळा आणणे या नियमाच्या अंतर्गत येते. याबद्दल 2017 पासून नियमात बदल केला गेला होता.

फलंदाजाने हेतुपूर्वक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या सहमतीशिवाय चेंडू हाताळला, तर त्या फलंदाजाविरुद्ध प्रतिस्पर्धा संघ अपील करू शकतो. तसेच याप्रकारे आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाद दिले जाते. दरम्यान, या प्रकारच्या विकेटसाठी गोलंदाजाला श्रेय दिले जात नाही.

पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व

बुधवारी सुरु झालेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 66.2 षटकात 172 धावांवर सर्वबाद झाले. त्यांच्याकडून मुशफिकूरने सर्वाधिक 35 धावा केल्या, तर शहादत हुसैनने 31 धावा केल्या. तसेच मिचेल सँटेनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडनेही पहिल्या दिवसाखेरपर्यंत पहिल्या डावात 12.4 षटकात 55 धावांत 5 विकेट्स गमावल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने 3 आणि तैजुल इस्लामने 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Majorda: धिरयोत उधळला रेडा, छातीत खुपसले शिंग; माजोर्डा मृत्यूप्रकरणातील संशयित अमेरिकेत, पोलिसांच्या वाढल्या अडचणी

Corlim Accident: ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर! भरधाव गाडीने दिली पादचाऱ्याला धडक; 39 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Bhai Dooj 2025: '7 रंगांचे तिलक, न कोमेजणारा हार'; नेपाळमध्ये कशी साजरी होते भाऊबीज? जाणून घ्या आगळीवेगळी प्रथा..

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

SCROLL FOR NEXT