Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: मुंबई इंडियन्सची ताकद वाढणार! 'या' वेगवान गोलंदाजाची होणार टीममध्ये एन्ट्री

आयपीएल 2023 उर्वरित हंगामासाठी मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाला संघात सामील करून घेतले असल्याचे समोर आले आहे.

Pranali Kodre

Mumbai Indians signed England pacer Chris Jordan: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत संमिश्र कामगिरी केली आहे. दरम्यान त्यांना काही खेळाडूंच्या दुखापतीचाही सामना करावा लागला आहे. याचदरम्यान आता मुंबई इंडियन्सने त्यांच्या संघात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन याचा समावेश केला असल्याचे समजत आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार जॉर्डन बदली खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्स संघात सामील होणार आहे. मात्र, तो कोणाच्या जागेवर संघात सामील होणार आहे, याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. तसेच अद्याप मुंबई इंडियन्सकडून याबद्दल स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

जॉर्डन डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्यावेळी त्याची मुळ किंमत 2 कोटी इतकी होती. दरम्यान, जॉर्डनला यापूर्वी आयपीएलचा चांगला अनुभव देखील आहे. तो याआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळला आहे.

त्याने आत्तापर्यंत 28 आयपीएल सामने खेळले असून 9.32 च्या इकोनॉमी रेटने 27 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच जॉर्डन फेब्रुवारीमध्ये आयएल टी20 स्पर्धा जिंकणाऱ्या गल्फ जायंट्स संघाचाही भाग होता. त्याने त्या स्पर्धेत 10 डावात 20 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच तो इंग्लंड संघातीलही प्रमुख खेळाडूंपैकी एक राहिला आहे.

टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धा जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचाही तो भाग होता. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी20 क्रिकेटमध्ये 87 सामने खेळले असून 96 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचा संघ सघ्या गोलंदाजी फळीत संघर्ष करताना दिसत आहे. मुंबईने या हंगामात आत्तापर्यंत 8 सामने खेळले असून 4 सामने जिंकले आहेत आणि 4 सामने पराभूत झाले आहेत. सध्या मुंबई गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 19 August 2025: नोकरीत बदलाची शक्यता, प्रवासाचे योग; मोठे निर्णय घाईघाईने घेऊ नका

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

Pune-Sindhudurg Flight: पुण्यातील कोकणवासियांना बाप्पा पावला... गणेश चतुर्थीनिमित्त 'Fly91'च्या उड्डाण संख्येत वाढ, वाचा सविस्तर

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

SCROLL FOR NEXT