IPL 2023: मुंबई इंडियन्सनंतर दिल्ली कॅपिटल्सवर नजर, 2015 च्या इतिहासाची होऊ शकते पुनरावृत्ती!

Delhi Capitals: आयपीएल 2023 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स संघ 1 विजयासह 6 सामन्यांतून 2 गुणांसह गुणतालिकेत 10 व्या क्रमांकावर आहे.
Delhi Capitals
Delhi CapitalsDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ आतापर्यंत चांगली कामगिरी करु शकला नाही. आयपीएल 2023 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स संघ 1 विजयासह 6 सामन्यांतून 2 गुणांसह गुणतालिकेत 10 व्या क्रमांकावर आहे.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली संघाला सलग 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर सहाव्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवायचा होता.

आता अशा परिेस्थितीत दिल्लीचा संघ अंतिम फेरी गाठू शकेल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याबद्दल जाणून घेऊया...

अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 4 गडी राखून पराभव केला. आयपीएल 2023 मधील दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिला विजय आहे. परंतु तरीही संघाला अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.

आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडे अजून 8 सामने खेळायचे आहेत. त्याला प्रत्येक सामना जिंकायचा आहे. तरच अंतिम फेरी गाठण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. संघाचा नियमित कर्णधार ऋषभ पंत दुखापतग्रस्त आहे.

या कारणास्तव तो आयपीएल 2023 मध्ये खेळत नाहीये. त्याच्या जागी डेव्हिड वॉर्नर कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे.

Delhi Capitals
IPL 2023 दरम्यान टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर यशस्वी शस्त्रक्रिया, WTC फायनलमधून...

मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

2015 मध्ये मुंबई इंडियन्सला पहिल्या 6 पैकी 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण त्यानंतर मुंबई संघाने करिष्माई कामगिरी करत 2015 च्या फायनलमध्ये स्थान मिळवले आणि विजेतेपद पटकावले. त्यानंतर अंतिम फेरीत मुंबई संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 41 धावांनी पराभव केला.

Delhi Capitals
IPL 2023: बेंगलोरने मारलं पंजाबचं मैदान! प्रभसिमरन - जितेशची झुंज गेली वाया

दिल्ली कॅपिटल्सला सलग 5 पराभव पत्करावे लागले

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल 2023 मध्ये सलग पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

संघ लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 50 धावांनी, गुजरात टायटन्स विरुद्ध 5 विकेट्स, राजस्थान विरुद्ध 57 धावांनी पराभूत झाला आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध 6 विकेट्सने आणि RCB विरुद्ध 23 धावांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर दिल्ली संघाने अरुण जेटली स्टेडियमवर केकेआरचा पराभव केला.

संघ दुखापतग्रस्त खेळाडूंच्या मोठ्या समस्येला तोंड देत आहे. ऋषभ पंत व्यतिरिक्त कमलेश नागरकोटी देखील दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com