Jofra Archer Dainik Gomantak
क्रीडा

रोहितसेनेला टेंशन! IPL 2023 चालू असतानाच जोफ्रा आर्चर गेलेला बेल्जियमला, कारण घ्या जाणून

जोफ्रा आर्चरची तंदुरुस्ती सध्या मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Pranali Kodre

Jofra Archer Injury: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ सध्या संघर्ष करताना दिसत आहे. त्यांना अनुभवी गोलंदाजाचीही कमी भासत असल्याचे दिसून आले आहे. त्यातच आता अशी माहिती समोर आली आहे की या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर बेल्जियमला त्याच्या हाताच्या कोपरावर छोटी शस्त्रक्रिया करण्यासाठी गेला होता.

द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार काहीदिवसांपूर्वी आर्चरच्या उजव्या कोपरावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तो या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात खेळला होता. पण त्यानंतर तो चार सामन्यांना मुकला होता. त्यानंतर तो पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात खेळला.

दरम्यान 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी सांगितले होते की आर्चरला छोटी दुखापत आहे. पण द टेलिग्राफने दिलेल्या रिपोर्टनुसार आर्चर शस्त्रक्रियेसाठी बेल्जियमला गेला होता.

आर्चरला पंजाब विरुद्धच्या सामन्यानंतर मंगळवारी (25 एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईने विश्रांती दिली होती. आता तो 30 एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून पुन्हा पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे.

खरंतर आर्चरला गेल्या दोन वर्षापासून याच कोपराच्या दुखापतीने त्रस्त केले आहे. त्यामुळे त्याला गेल्या दोन वर्षात अनेक मोठ्या स्पर्धांना मुकावे लागले आहे. पण त्याने काही दिवसांपूर्वीच जवळपास दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.

आर्चरने आयपीएल 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत 2 सामने खेळले असून 2 विकेट्स घेतले आहेत. त्याला आयपीएल 2022 लिलावात मुंबई इंडियन्सने 8 कोटी रुपयांना खरेदी केले होते. पण तो आयपीएल 2022 हंगामात खेळला नाही. तसेच अद्यापही त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह आहे.

मुंबई इंडियन्सच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी चालू हंगामात आत्तापर्यंत 7 सामने खेळले आहेत. यातील 3 सामने जिंकले आहे, तसेच ४ सामने पराभूत झाले आहे. सध्या हंगामातील एकूण 35 सामन्यांनंतर मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT