Mumbai Indians | Hardik Pandya | IPL 2024 X/MIPaltan
क्रीडा

Mumbai Indians Video: दोन हंगामानंतर हार्दिक पुन्हा मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये, देवाचा आशीर्वाद घेत ट्रेनिंगला सुरुवात

Hardik Pandya Start Training for IPL 2024: मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याने देवाचा आशीर्वाद घेत आयपीएल 2024 साठी तयारीला सुरुवात केली आहे.

Pranali Kodre

Captain Hardik Pandya Joins Mumbai Indians for IPL 2024

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या या 17 व्या हंगामाला सुरू होण्यासाठी अवघे 10 दिवस राहिले आहेत. अशात सर्वच सहभागी संघांनी या हंगामासाठी तयारीला सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सनेही सरावाला सुरुवात केली आहे.

मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याही संघात दाखल झाला असून त्याने मुंबई इंडियन्सबरोबर सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान, त्याआधी हार्दिकने आणि मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफने ड्रेसिंग रुममध्ये ईश्वर पुजा करत तयारीला सुरुवात केली. याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की हार्दिक किटबॅग घेऊन जात असताना ड्रेसिंग रुममध्ये जातो. तिथे त्याचे मुंबई इंडियन्सचा सपोर्ट स्टाफ त्याचे स्वागत करतो. त्यानंतर तिथे असलेल्या देवाच्या फोटोला त्याने हार घातला आणि समोर दिवा लावला.

त्यानंतर प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी नारळ फोडला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मुंबई इंडियन्सने लिहिले की 'चला सुरू करुया.' या व्हिडिओच्या खाली अनेक कमेंट्स आल्या आहेत.

आयपीएल 2024 हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला रोहित शर्माच्या जागेवर नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे या हंगामात रोहित केवळ खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे, तर हार्दिक कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.

खरंतर हार्दिकला 2021 आयपीएलनंतर मुंबई इंडियन्सने करारमुक्त केले होते. त्यानंतर गुजरात टायटन्स संघाने त्याला 2022 आयपीएलपूर्वी संघात घतले आणि त्याला नेतृत्वाची जबाबदारीही दिली.

त्याने त्याच्या नेतृत्वाखाली 2022 आणि 2023 असे दोनही हंगामात गुजरातला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवले. तसेच 2022 साली आयपीएलचे विजेतेपही मिळवले, परंतु, 2023 साली गुजरातला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

यानंतर आता 2024 आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्स संघात हार्दिकची घरवापसी झाली. गुजरातने 15 कोटी रुपयांमध्ये हार्दिकला मुंबईबरोबर ट्रेड केले. त्यामुळे आता हार्दिक पुन्हा एकदा मुंबईकडून खेळताना तर दिसेल, पण यावेळी तो कर्णधाराच्या भूमिकेतही असेल.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हार्दिकने आयपीएलमध्ये पदार्पणही 2015 साली मुंबई इंडियन्सकडून केले होते. तो यापूर्वी मुंबईकडून 2015 ते 2021 दरम्यान सात हंगाम खेळला आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून या सात हंगामात मिळून 92 सामन्यांमध्ये 1476 धावा केल्या. तसेच 51 विकेट्स घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मडगावात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग

Anupam Kher At IFFI: 'भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता'; अनुपम खेर अपयशाबद्दल म्हणाले की...

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT