Hardik Pandya IPL: 'हार्दिकविरुद्ध अहदमाबादच्या प्रेक्षकांनी करावी नारेबाजी...', माजी खेळाडू हे काय म्हणाला?

IPL 2024, MI vs GT: मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 मधील पहिला सामना अहमदाबादला गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. यावेळी प्रेक्षकांनी हार्दिकची हुर्यो उडवावी, असे मत माजी भारतीय क्रिकेटरने व्यक्त केले आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak
Published on
Updated on

Aakash Chopra want Ahmedabad crowd to boo Hardik Pandya during IPL 2024:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचा हा 17 वा हंगाम असून या हंगामातील पहिल्या दोन आठवड्यांचे म्हणजेच पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक गुरुवारी (22 फेब्रुवारी) जाहीर झाले आहे.

या वेळापत्रकानुसार मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध २४ एप्रिलला अहमदाबादला खेळणार आहे. या सामन्याला यंदा एक भावनिक किनार लाभली आहे. कारण यावेळी मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पहिल्यांदाच हार्दिक पंड्या करताना दिसणार आहे, तर रोहित शर्मा फलंदाज म्हणून खेळेल.

खंरतर हार्दिकने मुंबईकडूनच आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र 2022 हंगामापूर्वी मुंबईने त्याला करारमुक्त केले. त्यावेळी गुजरातने हार्दिकला संघात घेत त्याला नेतृत्वाची जबाबदारीही दिली.

हार्दिकनेही ही जबाबदारी सांभाळताना आपल्या नेतृत्वाखाली गुजरातला 2022 आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले. तसेच त्याच्या पुढच्यावर्षी 2023 आयपीएलमध्येही हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात संघ उपविजेता ठरला. मात्र, या दोन यशस्वी हंगामानंतर मुंबईने हार्दिकला ट्रेडिंगमध्ये पुन्हा संघात घेतले.

इतकेच नाही, तर रोहितला कर्णधारपदावरून काढून पाच वेळच्या विजेत्या मुंबई संघाचे नेतृत्व हार्दिकच्या हातात दिले. ही गोष्ट अनेक मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मात्र रुचली नाही.

Hardik Pandya
IPL 2024 Schedule: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! 'हे' दोन संघ चेन्नईमध्ये खेळणार पहिला सामना

त्यातच आता मुंबई आणि गुजरात संघ त्यांच्या यंदाच्या आयपीएल हंगामातील मोहिम एकमेकांविरुद्धच्या सामन्याने सुरू करणार असल्याने या सामन्याला एक भावनिक किनार लाभली आहे.

याचबद्दल बोलताना भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने म्हटले आहे की अहमदाबादमध्ये सामना पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांनी जेव्हा हार्दिक मुंबईसाठी गुजरातविरुद्ध मैदानात उतरेल, तेव्हा त्याच्याविरुद्ध घोषणाबाजी (Booed) करायला हवी. आकाश चोप्राने यावेळी २००८ मध्ये त्याने असा अनुभव घेतल्याचेही सांगितले.

जिओ सिनेमाशी बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, 'मला वाटते की हार्दिक पंड्याविरुद्ध अहमदाबादमध्ये प्रेक्षकांनी नारेबाजी करायला हवी. मी तुम्हाला असं का हे सांगतो. पहिली गोष्टी पहिल्या हंगामात मुंबई विरुद्ध कोलकाताचा सामना होता. त्यावेळी आम्ही मुंबईत वानखेडे स्टेडियमवर खेळत होतो. अजित अगरकर आमच्या कोलकाता संघात होता.'

'त्यावेळी आम्ही त्याला बाउंड्री लाईनवरून हटवले होते कारण तो मुंबईचा खेळाडू होता आणि मुंबईविरुद्ध खेळत होता, त्याचमुळे वानखेडेवरील प्रेक्षकांनी त्याच्याविरुद्ध नारेबाजी केली होती. त्याचमुळे आम्ही त्याला सर्कलच्या आत क्षेत्ररक्षणासाठी ठेवले होते कारण ते फार चांगले वाटत नव्हते.'

दरम्यान आकाश चोप्राने असेही सांगितले की भावनिक समीकरण जर खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये तयार झाले नाही, तर लीग आणखी रोमांचक होणार नाही.

Hardik Pandya
मुंबई इंडियन्सने IPL 2024 चे शेड्यूल शेअर करताच कमेंटचा पडला पाऊस, चाहते म्हणतात...

आकाश चोप्रा म्हणाला, 'आता हार्दिक पंड्या एकदा विजेतेपद जिंकल्यानंतर आणि पुढच्या हंगामातही संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेल्यानंतर मुंबईकडे परत गेला आहे, त्याने फ्रँचायझीदेखील (गुजरात) सोडली आहे. यानंतरही जर अहमदाबादच्या प्रेक्षकांमध्ये नाराजी नसेल, त्यांना वाईट वाटत नसेल, तर मग मजा काय आहे.'

'मला अपेक्षा आहे, नाही खरंतर आशा आहे की हार्दिकने नाणेफेकीसाठी जावे आणि लोकांनी त्याच्याविरुद्ध घोषणाबाजी करावी, त्यातूनच लीग परिपक्व होईल.'

दरम्यान, सध्यातरी हार्दिक वर्ल्डकप 2023 मध्ये झालेल्या दुखापतीतून सावरत असून तंदुरुस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता तो या दुखापतीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कसे पुनरागमन करणार याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

आयपीएल 2024 हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com