इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2022 च्या झालेल्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने 21 खेळाडूंना खरेदी केले, तर चार खेळाडूंना मुंबईस्थित आयपीएल फ्रँचायझीने कायम ठेवले. या रिटेन्शननंतर मुंबई इंडियन्सकडे 48 कोटी रुपयांची पर्स शिल्लक होती, त्यापैकी 15.25 कोटी रुपये संघाने इशान किशनवर लावले होते. टीम डेव्हिडच्या टॉपवर या टीमने 8.25 कोटी रुपये खर्च केले, तर जोफ्रा आर्चरला 8 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.(Mumbai Indians)
पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) प्रत्येकी 20 लाख रुपयांमध्ये 7 खेळाडूंना खरेदी केले, तर दोन खेळाडूंना प्रत्येकी 30 लाख रुपयांना खरेदी केले. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 च्या लिलावात पूर्णपणे रणनिती आखून भाग घेतला होता, पण संघाने मात्र मोठी चूक केली. मुंबई इंडियन्सने आपल्या संघात 25 खेळाडूंची भर घातली खरी पण संघात मात्र इतर अनुभवी विकेटकीपर फलंदाजच नाही. इशान किशनला एकमेव अनुभवी विकेटकीपर-फलंदाज म्हणता येईल.
मात्र इशान किशन (Ishan Kishan) चा इतिहास जाणून घेतला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंवा आयपीएलमध्ये इशान किशनला फार काही विकेटकीपिंग करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने भरपूर विकेटकीपिंग केले आहे, पण ज्या संघाकडे चांगले वेगवान गोलंदाज आणि चांगले फिरकीपटू असतील तर विकेटकीपिंग करणे तेवढे सोपे नाही. त्याचबरोबर जर इशन ला दुखापत झाली किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे संघाबाहेर असतील तर त्या ठिकाणी कोणाची निवड होणार किंवा तो कोण असेल, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आयपीएल (Ipl) 2022 च्या लिलावातून इशाननंतर मुंबई इंडियन्ससमोर दुसरा पर्याय आहे तो म्हणजे 20 वर्षीय आर्यन जुयाल, ज्याला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपये बेस प्राईजमध्ये खरेदी केले आहे. त्याला घरच्या मैदानावरील 35 सामन्यांचा अनुभव आहे, पण या सामन्यांमध्ये त्याने फक्त 16 झेल आणि 2 स्टम्पिंग केले आहेत. यावरून मुंबई इंडियन्सकडून आयपीएल 2022 च्या लिलावात ही मोठी चूक झाली आहे, जी सुधारण्याची संधी सध्या संघाला नाही, असा अंदाज बांधता येतो. गेल्या मोसमात संघात ईशान किशनशिवाय क्विंटन डीकॉक होता.
मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर , सूर्यकुमार यादव, बेसिल थम्पी, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, आर्यन जुयाल, मोहम्मद अर्शद खान, मयंक मार्कंडे, तिलक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डेनियल सैम्स, तयामल मिल्स, टिम डेविड, कीरोन पोलार्ड, ईशान किशन, देवलद ब्राविस,रिले मेरेडिथ, फेबियन एलन, अनमोलप्रीत सिंह, रमनदीप सिंह, राहुल बुद्धी, हृतिक शौकीन.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.