Rohit Sharma | Arjun Tendulkar  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: अर्जुन तेंडुलकर करणार मुंबई इंडियन्सकडून पदार्पण? कॅप्टन रोहितनं एका वाक्यात दिलं उत्तर

अर्जुन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पणाबद्दल रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Arjun Tendulkar IPL Debut in IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

दरम्यान, या हंगामात तरी अर्जुन तेंडुलकरचे आयपीएल पदार्पण होणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबद्दल मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेला अर्जुन गेल्या दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्याला 2021 साली मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. तसेच 2022 मध्ये त्यांनी त्याला 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते.

त्याला 2023 हंगामासाठीही मुंबईने कायम केले आहे. पण गेल्या दोन हंगामात त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही.

पण यंदा जसप्रीत बुमराह अनुपस्थित असल्याने गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अर्जुनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्जुन अष्टपैलू खेळाडू आहे. तो वेगवान गोलंदाजी करतो, तसेच खालच्या फळीत फलंदाजीत चांगले योगदान देऊ शकतो.

त्याच्याबद्दल मुंबई इंडियन्सच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रोहितने एका वाक्यात उत्तर दिले की 'चांगला प्रश्न आहे, याबद्दल आपण आशा करू शकतो.'

बाऊचर याबद्दल म्हणाले, 'अर्जुनने त्याच्या गोलंदाजीने अनेकांना प्रभावित केले आहे आणि जर तो तयार असेल, तर त्याचा निवडीसाठी नक्कीच विचार केला जाईल. अर्जुन नुकताच एका दुखापतीतून सावरला आहे. तो आज खेळेल.'

'त्यामुळे आशा आहे की आम्ही तो काय करू शकतो, हे पाहू शकतो. मला वाटते की तो गेल्या 6 महिन्यांपासून चांगले क्रिकेट खेळत आहे विशेषत: गोलंदाजीच्या दृष्टीने. त्यामुळे, जर तो निवडीसाठी उपलब्ध असेल, तर आमच्यासाठी चांगलेच आहे.'

याशिवाय रोहितला आगामी भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक पाहाता काही सामन्यांसाठी विश्रांती दिली जाणार की नाही, याबद्दलही बाऊचर यांनी मत व्यक्त केले आहे.

'रोहितला विश्रांती देण्याबद्दल म्हणत असाल, तर तो कर्णधार आहे. आशा आहे की त्याची लय चांगली राहावी आणि त्याला विश्रांतीची गरज पडू नये. पण आम्ही जशी परिस्थिती असेल, तशी ती स्विकारण्याचा प्रयत्न करू.'

मुंबई इंडियन्सला पहिला सामना 2 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT