Mumbai City FC 
क्रीडा

Indian Super League: मुंबई सिटी ने मारली 'टॉप फोर' मध्ये धडक

बिपिन सिंगच्या (Bipin Singh) उत्तरार्धातील गोलमुळे त्यांनी ईस्ट बंगालला 1-0 फरकाने हरविले.

किशोर पेटकर

पणजी: गतविजेत्या मुंबई सिटी एफसीने (Mumbai City FC) आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या (Play-off) आशा कायम राखताना निसटत्या विजयासह पहिल्या चार संघात धडक मारली. बिपिन सिंगच्या (Bipin Singh) उत्तरार्धातील गोलमुळे त्यांनी ईस्ट बंगालला (East Bengal) 1-0 फरकाने हरविले. सामना मंगळवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीनंतर 51 व्या मिनिटास डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर बिपिन सिंगने कोंडी फोडली. (Mumbai City FC defeated East Bengal In The Indian Super League)

ब्रॅडन इनमनच्या असिस्टवर या 26 वर्षीय आघाडीपटूने मोसमातील सहावा गोल नोंदविला. मुंबई सिटीचा हा 17 सामन्यांतील आठवा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे 28 गुण झाले. चौथा क्रमांक मिळविताना त्यांनी केरळा ब्लास्टर्सवर एका गुणाची आघाडी घेतली. ईस्ट बंगालला दहावा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 18 सामन्यानंतर त्यांचे 10 गुण आणि शेवटचा अकरावा क्रमांक कायम राहिला.

केरळा ब्लास्टर्ससाठी महत्त्वाचा सामना

आयएसएल स्पर्धेच्या आठव्या मोसमात हैदराबाद एफसीची प्ले-ऑफ फेरी जवळपास निश्चित आहे. सध्या अग्रस्थानी असलेल्या या संघाचे 17 सामन्यांतून 32 गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीपेक्षा त्यांचा एक गुण जास्त आहे. हैदराबादविरुद्ध बुधवारी (ता. 23) बांबोळी येथील अॅथलेटिक स्टेडियमवर होणारा सामना केरळा ब्लास्टर्ससाठी फार महत्त्वाचा आहे. प्ले-ऑफ फेरीचा दावा कायम राखण्यासाठी त्यांना हैदराबादला नमविण्यासाठी पूर्ण क्षमतेने खेळावे लागेल. सध्या केरळा ब्लास्टर्सचे 16 लढतीतून 27 गुण आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT