Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 5149 जागा भरणार; कसा करायचा अर्ज? वाचा..

Indian Railway recruitment 2026: पात्रतेसाठी उमेदवार किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावा आणि संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे.
Railway recruitment
Railway recruitmentDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय रेल्वेच्या Western Railway विभागात आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी मोठी रोजगारसंधी जाहीर झाली आहे. Railway Recruitment Cell Mumbai (RRC) यांनी २०२५-२६ या वर्षासाठी तब्बल ५,१४९ अप्रेंटिस पदांची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तांत्रिक शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही संधी करिअरची मजबूत पायाभरणी ठरू शकते.

या भरतीअंतर्गत मुंबई (BCT), वडोदरा, अहमदाबाद, राजकोट, भावनगर, रत्नागिरी तसेच विविध रेल्वे कार्यशाळांमध्ये प्रशिक्षणाच्या जागा उपलब्ध आहेत. फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, पेंटर, स्टेनो अशा विविध ट्रेडमध्ये अप्रेंटिसची निवड केली जाणार आहे.

पात्रतेसाठी उमेदवार किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावा आणि संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे. २१ मार्च २०२६ रोजी उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असणे बंधनकारक आहे. अनुसूचित जाती-जमातींना पाच वर्षे, तर इतर मागासवर्गीयांना तीन वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

Railway recruitment
Konkan Railway: फुकट्यांचा 'गेम ओव्हर'! कोकण रेल्वेची मोठी कारवाई; विनातिकीट प्रवाशांकडून वसूल केला 22 कोटींचा दंड

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. दहावी व आयटीआयमधील प्रत्येकी ५० टक्के गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. अर्ज शुल्क १०० रुपये असून SC/ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे.

Railway recruitment
Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेच्या नावाखाली 'भामट्यांचा' सुळसुळाट; नोकरीच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका, रेल्वे प्रशासनाचे आवाहन!

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://www.rrc-wr.com वर २१ फेब्रुवारी २०२६ पासून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ मार्च २०२६ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

विशेष म्हणजे, अप्रेंटिस प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांना भविष्यातील रेल्वेच्या लेव्हल-१ कायमस्वरूपी भरतीत २० टक्के आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे आयटीआयधारकांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com