Indian Super League 2021-22: उपांत्य फेरीच्या तारखा जाहीर

आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League ) फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
Indian Super League
Indian Super LeagueDainik Gomantak
Published on
Updated on

IndianSuperLeague 2021-22: आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. अंतिम सामना 20 मार्च रोजी पार पडणार आहे. (Indian Super League 2021-22 Semi-Final Dates Announced)

दरम्यान, एफसी गोवा संघाने आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत आता युवा खेळाडूंवर विश्वास दाखवत गुणतक्त्यातील स्थान सुधारण्याचे लक्ष्य बाळगल्याचे मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी नमूद केले.

Indian Super League
Indian Super League : एफसी गोवा गुणतक्त्यातील प्रगतीसाठी प्रयत्नशील

तसेच, एफसी गोवास (FC Goa) मंगळवारी रात्री बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर एटीके मोहन बागानकडून दोन गोलने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर डेरिक बोलत होते. अगोदरच्या लढतीत एफसी गोवाने चेन्नईयीनचा पाच गोलने धुव्वा उडविला होता, पण कोलकात्यातील संघाविरुद्ध त्यांना सूर गवसला नाही. संघातील काही प्रमुख खेळाडू कोविड-19 बाधित आहेत, तसेच काहींना दुखापतींचाही फटका बसला. त्यामुळे मध्यफळी कमजोर झाली आणि पराभवाचे हे एक कारण असल्याचे डेरिक यांनी स्पष्ट केले. एफसी गोवाचे सध्या 17 लढतीतून 18 गुण असून ते नवव्या क्रमांकावर आहेत. साखळी फेरीतील आणखी तीन सामने बाकी आहेत. एफसी गोवाचा पुढील सामना 19 रोजी हैदराबाद एफसीविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com