Mumbai City Dainik Gomantak
क्रीडा

मुंबई सिटीची चेन्नईयीवर निसटती मात

एकंदरीत मुंबई सिटीचा हा 14 लढतीतील सहावा विजय ठरला

दैनिक गोमन्तक

पणजी : सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना युवा आघाडीपटू विक्रम सिंग याने नोंदविलेल्या गोलमुळे गतविजेत्या मुंबई सिटीस आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत रविवारी विजयाचा जल्लोष करता आला. दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीला त्यांनी 1-0 फरकाने हरवले आणि प्ले-ऑफ फेरी दावाही कायम राखला.

फातोर्डा (Fatorda) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सामना झाला. 20 वर्षीय विक्रमने मोसमातील वैयक्तिक तिसरा गोल नोंदविताना चेन्नईयीनचा (chennai) गोलरक्षक देबजित मजुमदार याला 85व्या मिनिटास गुंगारा दिला.

बदली खेळाडू ब्रॅडेन इनमॅनच्या क्रॉसपासवर मुंबई सिटीचा दिएगो मॉरिसियो चेंडू नियंत्रित करू शकला नाही, मात्र विक्रमने संधी साधली आणि गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. तब्बल सात सामने विजयाविना राहिल्यानंतर डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने सामन्यात विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. भरपाई वेळेत संधी वाया गेल्यामुळे नंतर चेन्नईयीनला बरोबरीचे समाधान लाभले नाही. यावेळी त्यांच्या लुकास गिकिएविच याने फटका गोलपट्टीवरून मारला.

एकंदरीत मुंबई सिटीचा हा 14 लढतीतील सहावा विजय ठरला. त्यांचे आता 22 गुण आहेत. जमशेदपूर एफसीचेही तेवढेच गुण आहे, मात्र +5 गोलफरकामुळे ते चौथ्या, तर मुंबई सिटीला +3 गोलफरकासह पाचव्या स्थानी राहावे लागले. मागील चार लढती अपराजित राहिलेल्या चेन्नईयीन एफसीला 15 लढतीत सहावा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 19 गुणांसह ते सातव्या स्थानी कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

SCROLL FOR NEXT