MS Dhoni Wife Sakshi shares his Video celebrating India's Republic Day on January 26:
भारतभरात शुक्रवारी (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा केला जात आहे. भारत देश शुक्रवारी 75 वा प्रजासत्ताक दिन शुक्रवारी साजरा करत असून या निमित्ताने भारतीय नागरिक एकमेकांना शुभेच्छा देताना दिसून आले. दरम्यान, भारतीय क्रीडापटूंनीही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यातच शुक्रवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी हिने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ धोनीच्या रांचीच्या फार्महाऊसमधील असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की भारताचा तिरंगा उंचावर आकाशात डौलाने फडकत आहे आणि तिथून कॅप्टनकूल धोनी जात आहे. साक्षीने या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'सारे जहाँ से अच्छा' हे देशभक्तीपर गीत वाजवले आहे.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर अनेक चाहत्यांच्या कमेंट्सह आल्या आहेत.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की धोनी नेहमीच त्याच्या आर्मीप्रेमासाठी ओळखला जातो. त्याच्या बऱ्याचशा गोष्टी या आर्मीच्या युनिफॉर्मच्या केमोफ्लाज रंगामध्ये असतात.
तसेच त्याला 2011 वर्ल्डकपनंतर त्याला भारतीय सैन्याचे लेफ्टनंट कर्नल हे मानद पदही देण्यात आले होते. तो त्यानंतर अनेकदा आर्मी ट्रेनिंगमध्येही सहभागी झाला आहे. त्याने अनेकदा म्हटलेही आहे की तो देशाला सर्वात आधी प्राधान्य देतो.
दरम्यान, धोनी फारसा सोशल मीडियावर सक्रीय नसतो, मात्र त्याची पत्नी साक्षी सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट शेअर करत असते. त्यातूनच चाहत्यांना धोनीची झलक पाहायला मिळत असते.
नुकताच धोनी काही दिवसांपूर्वीच दुबईतून भारतात परतला आहे. तो ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या सुट्टीनिमित्त दुबईला कुटुंब आणि मित्रपरिवारासह फिरायला गेला होता. त्याच्या या ट्रिपचे काही फोटोही साक्षीने शेअर केले होते. त्याच्यासह यावेळी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील दिसला होता.
आता धोनी आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी कायम केले आहे. दरम्यान, तो या हंगामात संघाचे नेतृत्व करणार की दुसऱ्या खेळाडूकडे ही जबाबदारी सोपवणार, हे पाहावे लागणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सने गेल्यावर्षी धोनीच्या नेतृत्वाखाली विक्रमी पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.