MS Dhoni | Donald Trump Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: जेव्हा 'कॅप्टनकूल' धोनी डोनाल्ड ट्रम्पबरोबर खेळतो गोल्फ, Video व्हायरल

Donald Trump: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर गोल्फ खेळताना दिसला आहे.

Pranali Kodre

MS Dhoni enjoy playing golf with former president of the USA Donald Trump, video viral:

भारताचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. तो त्याच्या मित्रांसह अमेरिकेत सुट्ट्यांची मजा घेत आहे. याच दौऱ्यादरम्यान, त्याची अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट झाली.

विशेष म्हणजे धोनीने ट्रम्प यांच्याबरोबर गोल्फ खेळण्याचाही आनंद लुटला. या क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे. दरम्यान, हितेश सांघवी नावाच्या दुबईतील एका बिझिनेसमनने धोनीचा ट्रम्प यांच्याबरोबर ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लब बेडमिंस्टर येथे गोल्फ खेळतानाचा फोटो शेअर केला आहे.

सांघवी यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांचा व्हिडिओही शेअर केला होता. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर धोनी ट्रेंडही करू लागला आहे आणि त्यावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.

धोनीला गोल्फ खेळायला आवडते. तो बऱ्याचदा गोल्फ खेळताना यापूर्वीही दिसला आहे. त्याने कपिल देव यांच्याबरोबर देखील गोल्फ खेळले होते.

दरम्यान, धोनीने सध्या न्यूयॉर्कमध्ये सुरु असलेल्या अमेरिकन ओपनमधील सामने पाहायला सुद्धा हजेरी लावली होती.

कार्लोस अल्कारेज आणि ऍलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यावेळी धोनी स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे दिसले होते. त्याचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्याच्यासह त्याचे काही मित्रही होते. धोनी अनेकदा रांचीमध्ये टेनिस खेळतो. तसेच शक्य असेल, तेव्हा ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सामन्यांना हजेरीही लावतो.

धोनीचा लूकही चर्चेत

दरम्यान, धोनीच्या या अमेरिकन दौऱ्यादरम्यान त्याच्या लूकचीही चर्चा जोरदार आहे. धोनीचे केस वाढलेले दिसत असल्याने चाहत्यांना जुन्या दिवसाची आठवण होत आहे.

धोनी ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला होता, तेव्हा सुरुवातीला त्याचे मानेपर्यंत रुळणारे केस होते. त्याचमुळे चाहत्यांना त्याचे वाढलेले केस पाहून त्याच दिवसांची आठवण होत असून याबद्दल सोशल मीडियावर विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत.

आयपीएल 2024 मध्ये दिसणार धोनी?

धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्याने त्यानंतरही आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवले आहे. दरम्यान, 2023 स्पर्धा त्याच्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्ध असेल, असे म्हटले जात होते.

मात्र, त्यानेच तो 2024 स्पर्धाही खेळण्याती आशा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता धोनी आयपीएल 2024 स्पर्धेत खेळताना दिसण्याची चाहत्यांना अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India T20 World Cup Squad: सूर्यकुमारसाठी हा 'वर्ल्डकप' शेवटचा? हरपलेल्या फॉर्ममुळे वाढले टेन्शन; गिलबाबतही प्रश्नचिन्ह

स्वातंत्र्यसैनिकांनी जो गोवा दिला, तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी! CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Live News: डिचोलीत जिल्हा पंचायत निवडणुक मतदानाला सुरुवात!

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

SCROLL FOR NEXT