MS Dhoni playing today CSK vs PBKS Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: चेन्नईच्या चाहत्यांसाठी Good News! पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीचं दर्शन होणार? 'त्या' व्हिडिओमुळे चर्चेला उधाण

MS Dhoni playing today CSK vs PBKS: ३ एप्रिल रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात लढत होणार आहे.

Sameer Amunekar

MS Dhoni returns to CSK : आयपीएल २०२६ (IPL 2026) चा थरार रंगत असताना आज, ३ एप्रिल रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात लढत होणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील सीएसकेला पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी संघ उत्सुक आहे. मात्र, चाहत्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे - 'एमएस धोनी आज खेळणार का?'

इंजरीमुळे पहिल्या सामन्याला मुकला

हंगामाच्या सुरुवातीलाच एमएस धोनीला 'काफ इंजरी' (स्नायू दुखापत) झाल्याची बातमी समोर आली होती. याच दुखापतीमुळे धोनीला हंगामातील पहिल्या सामन्याला मुकावे लागले होते.

बीसीसीआय आणि सीएसके मॅनेजमेंटने स्पष्ट केले होते की, धोनी सध्या रिहॅब प्रक्रियेतून जात असून तो सुरुवातीचे दोन आठवडे मैदानाबाहेर राहू शकतो. धोनीसारख्या अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीमुळे पहिल्या सामन्यात चेन्नईची फलंदाजी काहीशी कमकुवत भासली होती.

नेट्समधील व्हिडिओ आणि चाहत्यांच्या आशा

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्याने चाहत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या आहेत. सीएसकेने स्वतः शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये धोनी नेट्समध्ये सराव करताना आणि इतर खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसत आहे.

नेट्समध्ये बॅटिंगचे कसब दाखवणाऱ्या 'माही'ला पाहून, तो आज पंजाबविरुद्ध मैदानात उतरणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, संघ व्यवस्थापन धोनीच्या फिटनेसबाबत कोणतीही घाई किंवा जोखीम पत्करण्यास तयार नाही. तो मैदानात खेळला नाही तरी डगआऊटमध्ये बसून मार्गदर्शन करणे, हे देखील युवा खेळाडूंसाठी मोठे टॉनिक ठरेल.

मागच्या हंगामातील कामगिरी

२०२५ च्या आयपीएल हंगामात धोनीने १३ डावांमध्ये १३५.१७ च्या स्ट्राईक रेटने १९६ धावा केल्या होत्या. यामध्ये १२ चौकार आणि १२ षटकारांचा समावेश होता. चेपॉकच्या मैदानावर धोनीचे रेकॉर्ड नेहमीच जबरदस्त राहिले आहे. अशा परिस्थितीत, आज संध्याकाळी ७:३० वाजता टॉसच्या वेळी ऋतुराज गायकवाड धोनीच्या समावेशाबाबत काय घोषणा करतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo: धगधगती घरे अन् किंकाळ्यांनी हादरले 'कांगो'! दहशतवाद्यांनी 43 निष्पापांचा घेतली जीव; युगांडा सीमेवर पुन्हा रक्ताची होळी

आयटी कंपनीचा अजब प्रकार! 20 जणांना डच्चू, एकालाच 'WFH' अन् पगारवाढ; पण 'त्या' अटीने कर्मचाऱ्याला फुटला घाम

Crime News: रस्त्यावर रक्ताचे सडे अन् क्रूरतेचा कळस! सूडाच्या अग्नीत जळाला संसार; घटस्फोटित पत्नीच्या हत्येसाठी नराधमाने गाठली नीचतेची पातळी

Iran US War: इराणच्या 'स्वदेशी' शक्तीपुढे सुपरपॉवरचा थरकाप! अमेरिकेचे 850 कोटींचे F-35 फायटर जमीनदोस्त; नव्या एअर-डिफेन्स सिस्टिमने दाखवली ताकद

Leopard Attack: ..पुन्हा घुमली बिबट्याची डरकाळी! कामुर्लीत वासराचा फडशा; परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT