MS Dhoni with Family | MS Dhoni Christmas 2022 | MS Dhoni Christmas Celebration 2022 Dainik Gomantak
क्रीडा

Christmas 2022: धोनीचे लाडक्या लेकीसह जोरदार ख्रिसमस सेलिब्रेशन, पत्नी साक्षीचीही साथ; पाहा व्हिडिओ

धोनीने त्याच्या कुटुंबासह नाताळाचे सेलिब्रेशन केले आहे.

Pranali Kodre

MS Dhoni: रविवारी जगभरात नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. अनेकांनी सोशल मीडियातून एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छाही दिल्या, तर अनेकांनी नाताळानिमित्त व्हिडिओही शेअर केले. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीनेही आपल्या कुटुंबियांसोबत नाताळाचे सेलिब्रेशन केले. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

धोनीने दुबईमध्ये त्याचे कुटुंबिय आणि मित्रपरिवारासह नाताळाच्या सुट्ट्यांचा आनंद घेतला आहे. त्याची मुलगी झिवाचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. या अकाउंटवरून धोनी कुटुंबाच्या नाताळ सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये झिवा वेगवेगळे गेम्स खेळताना दिसत आहे. तसेच ती तिचे बाबा आणि आई साक्षीबरोबरही मजा करताना दिसत आहे. धोनीचीही झलक या व्हिडिओत दिसत असून तो खूष दिसत आहे. त्याचबरोबर नाताळानिमित्त खास डिनर करतानाही तो दिसला. या व्हिडिओमध्ये धोनी कुटुंबासमवेत त्यांचा मित्रपरिवारही दिसत आहे.

(MS Dhoni celebrate Christmas with family)

झिवा धोनीच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा.'

तसेच या पूर्वी साक्षी धोनीनेही नाताळ सेलिब्रेशनचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते. धोनी सोशल मीडियावर फार सक्रिय नसला तरी साक्षी बरीच सक्रिय असते, त्यामुळे तिच्या पोस्टमधून चाहत्यांना धोनीची झलक पाहायला मिळत असते.

धोनीने 2020 सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळणे कायम केले आहे. तो आयपीएल 2023 मध्येही चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. दरम्यान, तो या हंगामातही सीएसकेचे नेतृत्त्व करणार की दुसऱ्या कोणत्या खेळाडूकडे कर्णधारपद सोपवणार हे पाहावे लागणार आहे.

धोनीने सीएसकेने आत्तापर्यंत खेळलेल्या प्रत्येक हंगामात नेतृत्व केले आहे. त्याने आयपीएल 2022 मध्ये रविंद्र जडेजाकडे सीएसकेचे कर्णधारपद सोपवले होते. मात्र, हंगामाच्या मध्यावर जडेजाने नेतृत्त्वाची जबाबदारी सोडल्याने पुन्हा धोनी कर्णधार झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT