Jasprit Bumrah  Dainik Gomantak
क्रीडा

Test Cricket Record: बुमराहचा कसोटीत धासू रेकॉर्ड, लारा अन् आफ्रिदी पडले फिके

Manish Jadhav

Test Cricket Record: टी-ट्वेन्टी (T20) आणि T10 क्रिकेटच्या जमान्यात आता कसोटी क्रिकेट खेळण्याची शैलीही बदलली आहे. आता जगातील बहुतेक संघ कसोटी क्रिकेट अतिशय आक्रमकपणे खेळतात.

भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे कसोटी संघ एकापेक्षा एक स्फोटक फलंदाजांनी भरलेले आहेत, ज्यांनी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटची मजा वाढवली आहे.

दरम्यान, आज आम्ही तुम्हाला टेस्ट क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम भारतीयाच्या नावावर आहे.

या भारतीय क्रिकेटपटूचे नाव जाणून तुम्हीही थक्क व्हाल. कसोटी सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीवर एक नजर टाकूया:

1. जसप्रीत बुमराह (भारत) – 35 धावा

भारताचा स्टार अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नावावर कसोटी सामन्याच्या एकाच षटकात सर्वाधिक 35 धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. बुमराहने 2022 साली बर्मिंगहॅम येथे इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा दिल्या. यादरम्यान जसप्रीत बुमराहच्या बॅटमधून 29 धावा आल्या आणि उर्वरित 6 धावा अतिरिक्त ठरल्या.

2. ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) – 28 धावा

कसोटी सामन्याच्या एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2003-04 मध्ये ब्रायन लाराने दक्षिण आफ्रिकेचा लेफ्ट आर्म स्पिनर रॉबिन पीटरसनच्या एका षटकात 28 धावा ठोकल्या होत्या. ब्रायन लाराने या कालावधीत 2 षटकार आणि 4 चौकार मारले होते.

3. जॉर्ज बेली (ऑस्ट्रेलिया) – 28 धावा

ऑस्ट्रेलियाचा माजी वनडे कर्णधार जॉर्ज बेलीने 2013-14 मध्ये पर्थ येथे इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस कसोटी सामन्यात इंग्लिश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या एका षटकात 28 धावा काढल्या होत्या. जॉर्ज बेलीने या कालावधीत 3 षटकार आणि 2 चौकार मारले होते.

4. केशव महाराज (दक्षिण आफ्रिका) – 28 धावा

दक्षिण आफ्रिकेचा ऑफ-स्पिन अष्टपैलू केशव महाराजने 2019 साली पोर्ट एलिझाबेथ येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात जो रुटच्या एका षटकात 28 धावा ठोकल्या. यावेळी केशव महाराजने 2 षटकार आणि 3 चौकार मारले होते. जो रुट हा पार्ट टाइम फिरकीपटू असून केशव महाराजने त्याच्या एका षटकात 28 धावा काढल्या होत्या.

5. शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) - 27 धावा

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) 2005 मध्ये लाहोरमध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑफस्पिनर हरभजन सिंगला एका षटकात 27 धावा दिल्या होत्या. यादरम्यान शाहिद आफ्रिदीने 4 षटकार मारले होते. शाहिद आफ्रिदीने या षटकात सलग चार षटकार मारल्यानंतर 2 धावा आणि नंतर 1 धाव घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT