Cricket Record: हा रेकॉर्ड आजही कायम, 6 चेंडूत 77 धावा; या खेळाडूचा जलवा पाहून...!

Most Expensive Over In Cricket History: न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर ली जर्मनने क्रिकेटच्या एका षटकात 77 धावा काढल्या होत्या.
Lee Zermon
Lee ZermonDainik Gomantak
Published on
Updated on

Lee Zermon Batting: चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये फिरकीपटू शिवा सिंगच्या षटकात 6 चेंडूत 7 षटकारांसह 43 धावा केल्या, पण क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरलेले नाही. न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर ली जर्मनने क्रिकेटच्या एका षटकात 77 धावा काढल्या होत्या. एका षटकात जर्मनने केलेली ही सर्वाधिक धावसंख्या होती. चला तर मग जाणून घेऊया, क्रिकेटच्या इतिहासातील या षटकाची कहाणी...

एका षटकात 77 धावा दिल्या

न्यूझीलंडकडून (New Zealand) चार कसोटी सामने खेळलेला माजी क्रिकेटपटू बर्ट व्हॅन्सच्या नावावर क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकण्याचा विक्रम आहे. त्याच्या ओव्हरमध्ये फलंदाजाने 77 धावा काढल्या होत्या. 1990 साली एका प्रथम श्रेणी सामन्यात कॅंटरबरीचा स्टार खेळाडू ली जर्मनने एकाच षटकात 70 धावा काढल्या होत्या. त्याचवेळी, त्याचा सहकारी खेळाडू रॉजर फोर्डने 5 धावा काढल्या होत्या. या षटकात बर्ट वन्सने एकूण 22 चेंडू टाकले होते.

Lee Zermon
World Record: 'या' भारतीय क्रिकेटरने 4325 मिनिटे क्रीजवर थांबून केला रेकॉर्ड !

या सामन्यात हा चमत्कार घडला

क्राइस्टचर्चमध्ये कॅंटरबरी विरुद्ध वेलिंग्टनच्या शेल ट्रॉफी सामन्याच्या अंतिम दिवशी हा चमत्कार घडला. वेलिंग्टनचा या हंगामातील शेवटचा सामना होता. त्यांनी डाव घोषित करत कॅंटरबरीसमोर 59 षटकांत 291 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दुसरीकडे, कँटरबरीची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या 108 धावांत त्यांनी 8 विकेट गमावेल होते, त्यामुळे वेलिंग्टन हा सामना सहज जिंकेल असं सर्वांना वाटत होतं, पण अचानक गेममध्ये ट्विस्ट आला.

ओव्हरची सुरुवात खूपच खराब झाली

बर्ट वन्सने षटकाची सुरुवात अतिशय खराब केली. त्याने सलग नो बॉल टाकले. पहिल्या 17 चेंडूंमध्ये त्याने फक्त एक चेंडू बरोबर फेकला. यादरम्यान ली जर्मनने आपले शतक शानदार पद्धतीने पूर्ण केले. वन्सने या षटकात एकूण 22 चेंडू टाकले आणि 77 धावा दिल्या. यानंतर कॅंटरबरी संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज होती. ली जर्मनने पहिल्या पाच चेंडूत 17 धावा काढल्या, पण शेवटच्या चेंडूवर त्याला एकही धाव करता आली नाही आणि सामना अनिर्णित राहिला.

Lee Zermon
Rishabh Pant Test Record: ऋषभ पंतने मोडला 69 वर्षे जुना विक्रम

बर्ट वन्सने असे षटक पूर्ण केले:

वन्सच्या षटकात धावा - 0444664614106666600401

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com