Marco Jansen Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: मार्को यान्सेनच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद, वर्ल्ड कपच्या एकाच हंगामात...

Marco Jansen: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेनचा भारतीय फलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला. 2023 च्या विश्वचषकात त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

Manish Jadhav

ODI World Cup 2023 IND vs SA: ODI World Cup 2023 IND vs SA: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी धुव्वा उडवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर 50 षटकांत 5 गडी गमावून 325 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 27.1 षटकांत 83 धावाच करु शकला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेनचा भारतीय फलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला. 2023 च्या विश्वचषकात त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

भारतीय फलंदाजांनी तूफान फटकेबाजी केली

दरम्यान, या सामन्यात भारतीय फलंदाजांनी मार्को यान्सेनच्या गोलंदाजीवर तूफान फटकेबाजी केली. मार्कोने सामन्यात 9.4 षटके टाकली, त्यादरम्यान त्याने 94 धावा दिल्या. या सामन्यात पहिल्याच षटकापासून त्याची खराब गोलंदाजी पाहायला मिळाली.

मार्कोने पहिल्याच षटकात 17 धावा दिल्या. विशेष म्हणजे, मार्कोने 9.4 षटकात 11 वाईड चेंडू टाकले. एकाच सामन्यात त्याने इतक्या धावा देण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वी, याच विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) सामन्यात त्याने 10 षटकांत 92 धावा दिल्या आहेत. मार्को यान्सेन आता विश्वचषकाच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा देणारा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेला 327 धावांचे लक्ष्य मिळाले

या सामन्यात भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. भारताकडून (India) फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक 101 धावांची खेळी केली. विराट कोहलीचे हे वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 49 वे शतक आहे. यासह विराटने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराटशिवाय, श्रेयस अय्यरने 77 धावांची, रोहित शर्माने 40 आणि जडेजाने 29 धावांची विस्फोटक खेळी खेळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT