T20 World Cup: आता खरी लढत! विश्वचषकाच्या 'सुपर 8' चा थरार सुरू; टीम इंडिया कधी, कुठे आणि कोणाशी भिडणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Team India's Schedule For Super 8 T20 World Cup 2026: आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे.
Team India's Schedule For Super 8 T20 World Cup 2026
Team India's Schedule For Super 8 T20 World Cup 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

Team India's Schedule For Super 8

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. भारतीय संघाने दिमाखात 'सुपर ८' फेरीत प्रवेश केला असून त्यांचे वेळापत्रकही समोर आले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा या स्पर्धेतील प्रवास टांगणीला लागला आहे. अमेरिकेने (USA) गुणतालिकेत घेतलेली झेप आणि सरस नेट रनरेटमुळे पाकिस्तानसमोर आता 'करो या मरो'ची स्थिती निर्माण झाली आहे.

पाकिस्तानच्या अडचणीत वाढ; अमेरिकेचे पारडे जड

ग्रुप 'A' मध्ये भारतापाठोपाठ दुसऱ्या स्थानासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. अमेरिकेने आपले चारही साखळी सामने खेळले असून २ विजयांसह ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेचा नेट रनरेट (+०.७८७) हा पाकिस्तानच्या (-०.४०३) तुलनेत बराच सरस आहे.

पाकिस्तानला पुढच्या फेरीत जाण्यासाठी नामिबियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात केवळ विजयच नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे अनिवार्य आहे. जर नामिबियाने पाकिस्तानला हरवले किंवा पावसाने खेळ बिघडवला, तर पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल आणि अमेरिका ऐतिहासिकरीत्या सुपर ८ मध्ये प्रवेश करेल.

Team India's Schedule For Super 8 T20 World Cup 2026
Goa Street Race: 'पुढील 3 वर्षे गोवा स्ट्रीट रेस होत राहील'! CM सावंतांचे प्रतिपादन; पर्यटनाला चालना मिळण्याचा केला दावा

सुपर ८ चे संभाव्य चित्र स्पष्ट

स्पर्धेतील २७ सामन्यानंतर सुपर ८ मध्ये पोहोचणाऱ्या इतर संघांचे चित्रही जवळपास स्पष्ट झाले आहे. भारतासोबत वेस्ट इंडिजने अधिकृतपणे पुढच्या फेरीत जागा मिळवली आहे. ग्रुप 'B' मधून श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया किंवा झिम्बाब्वे यांच्यापैकी एक संघ पात्र ठरेल. ग्रुप 'C' मध्ये वेस्ट इंडिजसोबत इंग्लंडचे पारडे जड असले तरी स्कॉटलंडच्या आशा अजूनही जिवंत आहेत. तर ग्रुप 'D' मधून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड पुढच्या फेरीत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.

Team India's Schedule For Super 8 T20 World Cup 2026
Goa Opinion: 'साळावली' धरणाला असाच विरोध झाला असता तर संपूर्ण दक्षिण गोव्याची गत काय झाली असती..?

संभाव्य वेळापत्रक

भारतीय संघ सुपर ८ च्या 'ग्रुप १' मध्ये खेळणार आहे. भारताचा पहिला सामना २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. या गटात भारतासमोर ऑस्ट्रेलिया किंवा झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांसारख्या कडव्या संघांचे आव्हान असणार आहे. २६ फेब्रुवारीला चेन्नईत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होण्याची शक्यता आहे, तर १ मार्चला कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध भारत आपली शेवटची सुपर ८ लढत खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com