Morocco vs Spain Dainik Gomantak
क्रीडा

Morocco vs Spain: पेनल्टी शुटआऊट मोरक्कोच्या पथ्थ्यावर; चांगला खेळ करूनही स्पेन स्पर्धेबाहेर

स्पेनवर 3-0 ने मात; मोरक्कोची क्वार्टर फायनलमध्ये धडक

Akshay Nirmale

Morocco vs Spain: कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत मंगळवारी राऊंड ऑफ 16 मधील पहिला सामना मोरक्को आणि स्पेन यांच्यात झाला. हा सामना पुर्णवेळेत गोलशुन्य बरोबरीत राहिला. अतिरिक्त वेळेतही कोणताही संघ गोल करू शकला नाही. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शुटआऊटमध्ये लावण्यात आला. यात मोरक्कोने स्पेनला 3-0 अशा गोलफरकाने नमवत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली.

पेनल्टी शुटआऊटमध्ये मोरक्कोचा स्कोअर 3-0 असा झाला. मोरक्कोसाठी अब्देलहमीद साबिरी, हाकिम जिएच आणि अशरफ हकीमी यांनी गोल केले. तर त्यांचा द्र बेनउल गोलचा फटका अडवला. तर स्पेनचे पाब्ले सराबिया, कार्लोस सोलर आणि सर्जियो बुस्केट्स या तिघांनाही गोल करण्यात अपयश आले. त्यानंतर मैदानात मोरक्कोच्या खेळाडुंसह प्रेक्षकांनी एकच जल्लोषाला सुरवात केली.

पुर्वार्धात दोन्ही संघांची गोलची पाटी कोरी राहिली. एकाही संघाला प्रतिस्पर्ध्यांवर गोल करता आला नाही. उत्तरार्धातही दोन्ही संघांना गोल करता आला नाही. काही वेळा स्पेनच्या खेळाडुंना संधी मिळाली, पण त्यांना त्याचे रूपांतर गोलमध्ये करण्यात अपयश आले. पुर्णवेळेत सामना गोलशुन्य बरोबरीत राहिला. त्यानंतर 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही सामना गोलशुन्य बरोबरीत राहिला. सामन्यात स्पेननेच चेंडुवर सर्वाधिक नियंत्रण राखले होते.

स्पेनने 2010 चा वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतरच्या वर्ल्डकप स्पर्धांमध्ये मात्र स्पेनला प्री-क्वार्टर फायनल राऊंडच्या पुढे जाता आले नाही. त्यापुर्वी स्पेन चार वेळा क्वार्टर फायनलमध्ये पोहचला आहे. मोरक्कोबाबत बोलायचे तर हा संघ एकदाही क्वार्टर फायनलमध्ये पोहचलेला नाही. 1986 मध्ये मोरक्कोचा संघ प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT