फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत सोमवारी रात्री उशीरा ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया यांच्यात उपउपांत्यपूर्व सामना खेळवला गेला. स्टेडियम 974 वर झालेल्या या सामन्यात ब्राझीलने 4-1 असा सहज विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
विशेष गोष्ट अशी की ब्राझीलने केलेले चारही गोल पहिल्या हाफमध्येच केले. याआधी असा विक्रम ब्राझीलने 68 वर्षांपूर्वी 1954 साली मेक्सिकोविरुद्ध केला होता.
दरम्यान सोमवारी झालेल्या सामन्यात ब्राझीलकडून (Brazil) विनिविनिशियस ज्युनियरने पहिला गोल केला. त्याने 7 व्या मिनिटालाच ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ब्राझीलचा कर्णधार नेमारने (Neymar) या सामन्यातून पुनरागमन तर केलेच, पण त्याने 13 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोलही नोंदवला. त्यामुळे पहिल्या 15 मिनिटातच ब्राझील 2-0 अशा आघाडीवर होते.
पहिल्या हाफमध्ये संपूर्णपणे ब्राझीलचेच वर्चस्व दिसून आले. त्यांच्याकडून 29 व्या मिनिटालाच रिचार्लिसन यानेही गोल साकारला. तर 36 व्या मिनिटाला लुकास पक्वेटाने गोल करत ब्राझीलला पहिल्या हाफमध्ये 4-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. आधीच ब्राझीलकडे 4 गोलची आघाडी असताना दक्षिण कोरीयाला सामन्यात पुनरागमन करण कठीण झाले होते.
दुसऱ्या हाफमध्येही ब्राझीलने ही आघाडी टिकवून ठेवण्यात यश मिळवले. पण तरी दक्षिण कोरियाने या हाफमध्ये पहिल्या हाफपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली. दरम्यान 76 व्या मिनिटाला पेक सुंगहो याने दक्षिण कोरियाकडून पहिला गोल नोंदवला. पण दक्षिण कोरियाला तोपर्यंत सामन्यात खुप उशीर झालेला होता.
ब्राझीलचा आता 9 डिसेंबर रोजी क्रोएशियाविरुद्ध उपांत्यपूर्व सामना होईल क्रोएशियाने जपानला पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.