India vs Sri Lanka, 2nd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला असा एक घातक वेगवान गोलंदाज मिळाला आहे, जो जसप्रीत बुमराहच्या करिअरसाठी मोठा धोका बनू शकतो. हा वेगवान गोलंदाज इतका जीवघेणा आहे की, खेळपट्टीवरच प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांचे पाय थरथर कापतात. आता हा खेळाडू क्रिकेट T20, कसोटी आणि ODI या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा सर्वात आवडता वेगवान गोलंदाज बनला आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडही या खेळाडूच्या कामगिरीवर खूप खूश असून आता हा वेगवान गोलंदाज दीर्घकाळ टीम इंडियाकडून खेळत राहणार आहे.
आता टीम इंडियातील हा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) करिअरसाठीही धोकादायक ठरु शकतो. हा घातक वेगवान गोलंदाज दुसरा कोणी नसून मोहम्मद सिराज आहे. कोलकात्याच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराजने किलर गोलंदाजी करताना 3 बळी घेतले आहेत.
दुसरीकडे, जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचे झाल्यास, आता तो दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर राहणार आहे. टीम इंडिया (Team India) सध्या श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ भारत दौऱ्यावर जाणार आहेत.
जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. जसप्रीत बुमराहला जुलै 2022 मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर कंबरेचे 'स्ट्रेस फ्रॅक्चर' झाले होते आणि आता तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. टीम इंडियामधून तो अनिश्चित काळासाठी बाहेर आहे.
अशा परिस्थितीत, आता जसप्रीत बुमराहला पर्याय म्हणून संघ व्यवस्थापन मोहम्मद सिराजला तयार करत आहेत. मोहम्मद सिराजची गोलंदाजी किफायतशीर ठरत आहे. संथ चेंडूवर विकेट घेण्यात तो माहीर आहे.
गेल्या वर्षी 2022 मध्ये मोहम्मद सिराज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. 2022 मध्ये मोहम्मद सिराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 डावात 41 विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद सिराजने टीम इंडियासाठी 18 एकदिवसीय सामन्यांमध्ये 29 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर, 8 टी-20 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद सिराजने टीम इंडियासाठी 15 टेस्ट मॅचमध्ये 46 विकेट घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.