Mohammed Siraj Dainik Gomantak
क्रीडा

ODI Ranking: सिराज सुस्साट...! ऑस्ट्रेलियन दिग्गजाला पछाडत पुन्हा मिळवला 'नंबर वन'चा ताज

Mohammed Siraj: वनडे क्रमवारीत सिराज पुन्हा नंबर वन! टॉप-१० मध्ये दोन भारतीय गोलंदाजांचा समावेश

Pranali Kodre

Mohammed Siraj ICC ODI Ranking:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी ताजी वनडे क्रमवारी जाहिर केली असून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला मोठा फायदा झाला आहे. सिराज पुन्हा एकदा क्रमांक एकचा गोलंदाज बनला आहे.

सिराजने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती. त्याने 7 षटकात 21 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. यातील 4 विकेट्स त्याने एकाच षटकात घेण्याचा पराक्रम केला होता.

त्याच्या या कामगिरीमुळे तो आता पुन्हा वनडे क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. याआधी तो मार्च 2023 मध्ये अव्वल क्रमांकावर होता. त्याने आशिया चषकात एकूण 10 विकेट्स घेतल्या. त्याने पुन्हा क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवतना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज जोश हेजलवूडला मागे टाकले आहे.

सिराजचे आता 694 रेटिंग पॉइंट्स आहेत, तर हेडलवूडचे 678 रेटिंग पॉइंट्स आहेत. सिराजने केवळ हेजलवूडलाच नाही, तर ट्रेंट बोल्ट, राशिद खान आणि मिचेल स्टार्कलाही मागे टाकले आहे. अफगाणिस्तानचे मुजीब उर रेहमान आणि राशिद खान यांनाही या क्रमवारीत फायदा झाला आहे.

मुजीब आता 657 रेटिंग पॉइंट्ससह चौथ्या क्रमाकंवार आला आहे, तर राशिद खान 655 रेटिंग पॉइंट्ससह पाचव्या क्रमांकावर आला आहे. दीर्घकाळाने वनडेत पुनरागमन केलेला बोल्ट 677 रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच स्टार्क सहाव्या क्रमांकावर आहे.

केशव महाराजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात 4 विकेट्स घेतले होते. त्यामुळे त्यानेही क्रमवारीत मोठी उडी घेत 15 वे स्थान मिळवले आहे.

दरम्यान, पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये सिराज व्यतिरिक्त कुलदीप यादव आहे. पण, तो तीन स्थानांनी घसरून 9 व्या क्रमांकावर आला आहे. या दोघांव्यतिरिक्त पहिल्या 20 गोलंदाजांमध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. त्यांच्यानंतर जसप्रीत बुमराहची सर्वोत्तम क्रमवारी असून तो 22 व्या क्रमांकावर आहे.

आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिकाही क्रमवारीत मोठे बदल घडवू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT