ODI Ranking: भारताचा विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव, फायदा मात्र पाकिस्तानचा! ICC ची वनडे क्रमवारी जाहीर

ICC ODI Ranking: वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकासाठी भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात अटीतटीची शर्यत सुरू आहे.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

India, Pakistan, Australia ICC ODI Team Ranking:

आयसीसीच्या वनडे क्रमवारीत पहिल्या तीन स्थानांमध्ये मोठी स्पर्धा सध्या सुरू असलेली दिसत आहे. ही स्पर्धा भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू आहे.

नुकतीच रविवारी (17 सप्टेंबर) आशिया चषक स्पर्धा संपली, तसेच ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिकाही संपली. त्यानंतर आता आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यानुसार पाकिस्तानने रविवारी अव्वल क्रमांक मिळवला आहे.

दरम्यान, आशिया चषक सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान अव्वल क्रमांकावर होता. मात्र, त्यांना सुपर फोर फेरीतून बाहेर जावे लागल्यानंतर अव्वल स्थान गमवावे लागले होते.

तसेच ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले दोन सामने जिंकल्याने अव्वल स्थान मिळवले होते. तर भारतीय संघाने दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर चढ-उतार आशिया चषकादरम्यान केला.

India vs Pakistan
IND vs SL Final: अवघ्या सव्वा दोन तासांत श्रीलंकेचा 'खेळ' खल्लास अन् सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा सुळसुळाट

भारताचा विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव, फायदा पाकिस्तानचा

आता रविवारी (17 सप्टेंबर) भारतीय संघाने श्रीलंकेला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात 10 विकेट्सने पराभूत केले; तसेच रविवारीच ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचव्या वनडेत पराभव स्विकारावा लागल्याने मालिका 3-2 अशा फरकाने गमवावी लागली. त्यामुळे पाकिस्तानला मात्र फायदा झाला आहे.

पाकिस्तान संघाने पुन्हा अव्वल क्रमांक मिळवला आहे. पाकिस्तानचे 115 गुण आहेत. तसेच भारतीय संघाने आशिया चषक जिंकल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. भारताचेही 115 गुण आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया मात्र पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांचे 113 गुण आहेत.

अव्वल क्रमांकासाठी शर्यत

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पाकिस्तानने जरी अव्वल क्रमांक मिळवला असला, तरी ते येत्या आठवड्यात पुन्हा खाली जाऊ शकतात. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान 3 सामन्यांची वनडे मालिका आहे. ही मालिका 5 ऑक्टोबरपासून सुरी होणाऱ्या वर्ल्डकपपूर्वी क्रमवारी निश्चित करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

India vs Pakistan
IND vs AUS: भारताविरुद्ध ODI मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा, स्मिथ-कमिन्ससह 'या' दिग्गजांचेही कमबॅक

या मालिकेत भारताला पहिल्याच सामन्यावेळी अव्वल क्रमांकावर जाण्याची संधी असणार आहे. जर भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात पराभूत केले, तर भारतीय संघ अव्वल क्रमांकावर विराजमान होईल आणि पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर येईल.

तसेच भारताने या मालिकेत किमान दोन विजय मिळवले, तरी भारत अव्वल क्रमांकावर राहिल. मात्र, जर भारताला या मालिकेत ऑस्ट्रेलियाने किमान २ सामन्यात पराभूत केले, तर पाकिस्तान अव्वल क्रमांकावर कायम राहिल, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिल.

तसेच ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने जिंकले, तर ते अव्वल क्रमांक मिळवतील. त्यामुळे आता वनडे क्रमवारीतील अव्वल क्रमांकासाठीची ही शर्यत कोण जिंकणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com