Mohammed Siraj  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: मोहम्मद सिराजने केला 'हा' लाजीरवाणा रेकॉर्ड नावावर, IPL मधील...

Mohammed Siraj Bowling: आयपीएल 2023 च्या (IPL 2023) पहिल्या सामन्यात RCB ने मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून पराभव केला.

Manish Jadhav

Mohammed Siraj Bowling: आयपीएल 2023 च्या (IPL 2023) पहिल्या सामन्यात RCB ने मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून पराभव केला.

मुंबईने आरसीबीला विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य दिले होते, जे विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने सहज गाठले.

आरसीबीचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली, पण यासह त्याने एक लाजीरवाणा रेकॉर्डही केला. त्याबद्दल जाणून घेऊया....

हा रेकॉर्ड सिराजच्या नावावर नोंदवला गेला

आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याच्या चार षटकांत 21 धावांत 1 बळी घेतला. त्याने पहिल्या षटकात फक्त 2 धावा दिल्या.

त्याचवेळी, त्याने दुसऱ्या षटकात 1 धाव दिली आणि तिसऱ्या षटकातही त्याने शानदार गोलंदाजी केली. त्यानंतर, 19 वे षटक टाकण्यासाठी कर्णधार फाफ डू प्लेसिसने सिराजला बोलावले, पण त्याने 11 चेंडूचे षटक टाकून लाजीरवाणा रेकॉर्ड केला.

एका ओव्हरने लय बिघडवली

मोहम्मद सिराजने 19 व्या षटकाचा पहिला चेंडू डॉट टाकला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर धाव दिली. त्यानंतर त्याने सलग चार चेंडू वाईड टाकले आणि तो आपली लय गमावत राहिला.

त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर धाव दिली. चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर त्याला चौकार मारला. त्यानंतर पुढचा चेंडू त्याने वाईड टाकला आणि सहावा चेंडू डॉट होता.

अशाप्रकारे त्याने ओव्हरमध्ये एकूण 11 चेंडू टाकले. जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठे षटक आहे. सिराजने या षटकात एकूण 16 धावा दिल्या.

याआधी, आयपीएलमध्ये (IPL) सर्वात मोठे षटक टाकण्याचा रेकॉर्ड मुनाफ पटेलच्या नावावर होता. त्याने 2012 मध्ये 10 चेंडूत हे ओव्हर पूर्ण केले होते.

आरसीबीने अनेक सामने जिंकले

मोहम्मद सिराज 2017 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आरसीबी संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. जेव्हा तो आपल्या लयीत असतो, तेव्हा तो कोणत्याही फलंदाजीच्या आक्रमणाला रोखू शकतो. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 66 सामन्यांत 96 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "तुम्ही भाजपची B-Team, आम्हीच तुम्हाला नाकारतो", काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत; गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे'

Diwali 2025: पणत्या बनवण्याचा वारसा मावळतोय! डिचोलीतील व्यवसाय अंधाराखाली; राज्याबाहेरील पणत्यांची चलती

Goa Police App: गोवा पोलिस आता ‘स्‍मार्ट’ मोबाईलवर! सूचना, सायबर सुरक्षिततेसंबंधी माहिती मिळणार तात्काळ

Panaji: कारमध्ये कोंडले, लाथाबुक्यांनी केली मारहाण; तक्रारदाराची साक्ष देण्यास नकार; खंडणी प्रकरणातील 6 आरोपी निर्दोष

Goa Live News: फर्मागुडी येथील जीव्हीएम सर्कल जवळ कार व स्कुटर यांच्यात अपघात

SCROLL FOR NEXT