Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: आयपीएल 2023 चा सहावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे.
या सामन्यापूर्वी CSK कर्णधार एमएस धोनीच्या फिटनेसबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. CSK कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) सध्या गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे.
अशा परिस्थितीत तो आज होणाऱ्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
IPL 2023 च्या पहिल्या सामन्यादरम्यान, MS धोनी (MS Dhoni) गुजरातच्या डावात विकेटकीपिंग करताना जखमी झाला होता.
वास्तविक, गुजरात टायटन्सच्या डावाच्या 19व्या षटकात दीपक चहर गोलंदाजीसाठी आला होता. या षटकात धोनीने डाइव्ह मारत चौकार रोखण्याचा प्रयत्न केला.
मात्र, डाइव्हचा प्रयत्न करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर फिजीओंना मैदानावर बोलावून त्याच्यावर उपचार करण्यात आले. तो पूर्णपणे तंदुरुस्त असला तरी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (Lucknow Super Giants) खेळल्या जाणाऱ्या सामन्यातही तो दिसू शकतो.
एमएस धोनीच्या दुखापतीबद्दल अपडेट देताना, सीएसकेच्या अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, 'तो पूर्णपणे बरा आहे. काळजी नाही. एमएस गुडघ्याच्या दुखापतीला चांगल्या प्रकारे हाताळत आहे आणि लखनऊविरुद्ध त्याने सुरुवात करु नये असे कोणतेही कारण नाही. धोनी आणि संपूर्ण संघ चेपॉकमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे.'
पहिल्या सामन्यात एमएस धोनीच्या दुखापतीसह चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) आणखी एक मोठा धक्का बसला. या मोसमातील पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सने संघाचा 5 विकेट्सने पराभव केला होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट गमावत 178 धावा केल्या. यानंतर गुजरात टायटन्सने 19.2 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.