Mohammad Shami ICC
क्रीडा

World Cup फायनलनंतर कसे होते ड्रेसिंग रुममध्ये वातावरण? शमी म्हणाला, 'सर्वचजण तेव्हा...'

Mohammad Shami: वर्ल्डकप 2023 फायनलमधील भारताच्या पराभवानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरणाबद्दल आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीबद्दल मोहम्मद शमीने खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Mohammed Shami on Indian dressing room environment and PM Narendra Modi visit after Cricket World Cup 2023 final:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा भारतात पार पडली. या स्पर्धेतील अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने विजय मिळवत सहाव्यांदा वर्ल्डकप उंचावला. मात्र, भारताचे तिसऱ्यांना वनडे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न मात्र भंगले.

या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ स्पर्धेत सलग 10 विजयांसह अपराजित होता. मात्र अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने भारतीय चाहत्यांसह भारतीय संघातील खेळाडूही भावूक झाले होते.

दरम्यान, या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण कसे होते, याबद्दल मोहम्मद शमीने खुलासा केला आहे. याबरोबरबरच अंतिम सामन्यानंतर नाराज झालेल्या भारतीय संघाला सांत्वन करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्याबद्दलही शमीने प्रतिक्रिया दिली आहे.

स्पोट्स् तकशी बोलताना शमी म्हणाला, 'मी पंतप्रधान मोदी यांचे मोठ्याने आभारही मानू शकत नव्हतो. आम्ही सामन्यानंतर खूप दुखावलेलो होतो. आम्ही दोन महिने खूप चांगले खेळलो, पण एक वाईट दिवस होता.'

'प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते की आम्हाला काय वाटत आहे. पण जेव्हा पंतप्रधान तुम्हाला भेटायला येतात, तेव्हा तुम्हाला त्यांना सन्मान द्यावा लागतो आणि तुमची मान ताठ ठेवायला लागते.'

मोदी यांच्या भेटीबद्दल शमी म्हणाला, 'आमच्या सर्वांसाठी ते एक सरप्राईज होते. आम्हाला ड्रेसिंग रुममध्ये मोदीजी भेटायला येत आहेत, हे माहित नव्हते.'

'कोणीही काहीही खात नव्हते आणि कोणीही कोणाशी बोलत नव्हते. त्यांना पाहून सर्वजण चकीत झाले होते. खरंतर त्यानंतर आम्ही एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. ते एकएक करून प्रत्येकाला भेटले, कदाचीत त्यावेळी आम्हाला त्यावेळी त्याचीच गरज होती.'

त्याचबरोबर सर्व खेळाडूंच्या डोळ्यात पाणी असल्याचे शमीने सांगितले. तो म्हणाला, 'वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर माझ्या डोळ्यात पाणी होते. मी त्या खेळाडूंपैकी कदाचीत एक असेल, जे पुढील वर्ल्डकप खेळणार नाहीत. हे कोणीही असू शकते.'

'मला असे वाटत होते की एखादी गोष्ट आत्ता आमच्या समोर होती आणि अचानक ती गायब झाली. त्यामुळे सर्वचजण रडत होते.'

दरम्यान, या स्पर्धेत शमीने शानदार कामगिरी केली होती. त्याने 7 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या होत्या. तो या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT