Mohammad Kaif Dainik Gomantak
क्रीडा

Mohammad Kaif: वयाच्या बेचाळीशीतही कैफने दाखवली चित्त्याची चपळाई, घेतलेत चक्क 3 कॅच, पाहा Video

Legends League Cricket 2023: मोहम्मद कैफने शनिवारी तीन झेल घेत चाहत्यांना जुन्या दिवसांची आठवण करून दिली.

Pranali Kodre

Mohammad Kaif takes brilliant three catches: एखादा व्यक्ती मधील असलेली कला ही आयुष्यभर त्याची साथ देत असते. त्याप्रमाणे खेळाडूनेही निवृत्ती घेतली असली, तरी तो खेळ खेळणे विसरत नाही. याचाच प्रत्येय नुकताच लीजंड्स लीगमध्ये पाहायला मिळाला आहे.

शनिवारी एशिया लायन्स विरुद्ध इंडिया महाराजा संघात एलिमिनिटरचा सामना पार पडला. या सामन्यांत क्रिकेट चाहत्यांना जुन्या मोहम्मद कैफची झलक पाहायला मिळाली. कैफ या स्पर्धेत इंडिया महाराजाकडून खेळत असून त्याने या सामन्यात तीन शानदार झेल घेतले. त्याच्या झेलांचे व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे.

या सामन्यात कैफने पहिला झेल अप्रितिमरित्या घेतला. 9 व्या षटकात प्रज्ञान ओझा गोलंदाजी करताना त्याने ५० धावांवर खेळणाऱ्या उपुल थरंगाला बाद केले. थरंगाचा झेल कैफने एका हाताने घेतला.

त्यानंतर 16 व्या षटकात प्रविण तांबेच्या गोलंदाजीवर कैफने मोहम्मद हाफिजचा (38) धावत येऊन सूर मारत दुसरा सुरेख झेल घेतला. यानंतर 20 व्या षटकातही त्याने स्टुअर्ट बिन्नीच्या गोलंदाजीवर थिसरा परेराचा (24) झेल घेतला.

याच्या 42 व्या वर्षी देखील मोहम्मद कैफने क्षेत्ररक्षणादरम्यान दाखवलेल्या या तंदुरुस्तीचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. कैफ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना नेहमीच त्याच्या क्षेत्ररक्षणासाठी चर्चेत राहायचा. त्याला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये देखील गणले जाते.

एशिया लायन्सचा विजय

दरम्यान, एशिया लायन्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 191 धावा उभारल्या इंडिया महाराजाकडून स्टुअर्ट बिन्नी आणि प्रज्ञान ओझाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर 1 विकेट प्रविण तांबेने घेतली.

त्यानंतर 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिया महाराजा संघाचा डाव 16.4 षटकातच संपला. इंडियाकडून कर्णधार गौतम गंभीरने सर्वाधिक 32 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पाही ओलांडता आळा नाही.

एशिया लायन्सकडून सोहेल तन्वीर, अब्दुर रझाक, मोहम्मद हाफीज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच इसरू उडाना, कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि तिलकरत्ने दिलशान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्यामुळे एशिया लायन्सने हा सामना 85 धावांनी जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

आता अंतिम सामना एशिया लायन्स विरुद्ध वर्ल्ड जायंट्स संघात सोमवारी रंगणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cruise Tourism: क्रूझवरुन गोव्यात 67,594 प्रवासी, 9 महिन्यांत कमावलं 4.82 कोटींचं उत्पन्न; मुरगाव बंदर बनलं क्रूझ पर्यटनाचं केंद्र

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

The Hundred League: 13 चेंडूत 50 धावा...! ‘द हंड्रेड’मध्ये आरसीबीच्या खेळाडूंचा धमाका; जेकब बेथेलने मोडला 136 वर्ष जुना रेकॉर्ड

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT