Surya Grahan 2026: यंदाची महाशिवरात्री ठरणार 'टर्निंग पॉईंट'! सूर्यग्रहण कोणासाठी शुभ-अशुभ? 'या' 4 राशींच्या अडचणी वाढणार

Surya Grahan 2026: यंदाच्या वर्षाची सुरुवात खगोलप्रेमी आणि धार्मिक श्रद्धा असलेल्या लोकांसाठी अत्यंत विलक्षण ठरली आहे.
Surya Grahan 2026
Surya GrahanDainik Gomantak
Published on
Updated on

Surya Grahan 2026: यंदाच्या वर्षाची सुरुवात खगोलप्रेमी आणि धार्मिक श्रद्धा असलेल्या लोकांसाठी अत्यंत विलक्षण ठरली आहे. फेब्रुवारी महिन्यात एका बाजूला शिवभक्तीचा महाकुंभ म्हणजेच 'महाशिवरात्री' साजरी होत असतानाच त्याच्या अवघ्या दोनच दिवसांनी वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उत्साह अनुभवल्यानंतर 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणारी ही खगोलीय घटना ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म अशा दोन्ही दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सण आणि ग्रहण यांच्यातील हा अल्प कालावधी पर्यावरणासह मानवी जीवनावरही खोलवर परिणाम करणारा ठरु शकतो.

द्रिक पंचांगानुसार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी लागणारे हे सूर्यग्रहण 'वलयाकार' स्वरुपाचे असेल. विज्ञानाच्या भाषेत याला 'रिंग ऑफ फायर' असे म्हटले जाते. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर असतो आणि तो सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही, तेव्हा सूर्याचा फक्त मध्यभाग झाकला जातो आणि कडेचा भाग एखाद्या सोन्याच्या अंगठीसारखा चमकताना दिसतो. खगोलप्रेमींसाठी हे दृश्य अत्यंत मनोहारी असले तरी, ज्योतिषशास्त्रात ग्रहण काळाला नेहमीच संवेदनशील मानले जाते. विशेषतः महाशिवरात्रीसारख्या आत्मिक ऊर्जा देणाऱ्या सणानंतर लगेचच ग्रहण लागणे, हे मोठ्या बदलांचे संकेत मानले जातात.

Surya Grahan 2026
Weekly Horoscope: फेब्रुवारीचा दुसरा आठवडा या राशींसाठी ठरणार 'लकी'; लक्ष्मीची कृपा अन् घरात येणार पैसाच पैसा!

वेळेचा विचार करता, भारतीय प्रमाणवेळेनुसार हे सूर्यग्रहण दुपारी 03:26 वाजता सुरु होईल आणि संध्याकाळी 07:57 वाजता समाप्त होईल. मात्र, भारतीय नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी अशी की, हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे मुख्यत्वे दक्षिण गोलार्धातील काही देशांतून दृश्यमान होईल. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे धार्मिक दृष्टीने मानला जाणारा 'सूतक काळ' येथे लागू होणार नाही. असे असले तरी, ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार ग्रहांचे परिणाम वैश्विक असतात. ज्योतिषाचार्य हर्षवर्द्धन शांडिल्य यांच्या मते, ग्रहण काळात राहु-केतुचा प्रभाव वाढल्यामुळे मानवी स्वभावात मानसिक आणि भावनिक चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

Surya Grahan 2026
Horoscope 4 February 2026: बुधवारी 'या' 5 राशींवर लक्ष्मीची कृपा, नोकरीत प्रमोशन आणि व्यवसायात प्रगती निश्चित

या सूर्यग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव काही ठराविक राशींवर दिसून येईल. सूर्य हा आत्मबळ आणि नेतृत्वाचा कारक असल्यामुळे सिंह राशीच्या जातकांनी कामाच्या ठिकाणी सावध राहणे आवश्यक आहे, कारण त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना मानसिक थकवा आणि आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. वृश्चिक राशीसाठी हा काळ आर्थिक जोखमीचा असून, गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक न घेतल्यास नुकसान सोसावे लागू शकते. तर मकर राशीच्या लोकांनी कौटुंबिक वादात संयम राखणे गरजेचे आहे, अन्यथा घरात क्लेश वाढू शकतात.

Surya Grahan 2026
Weekly Horoscope: धन, यश आणि मान-सन्मान देणारा आठवडा! 'या' राशींवर लक्ष्मीची विशेष कृपा; वाचा संपूर्ण माहिती

ग्रहण काळात काय करावे आणि काय टाळावे, याचे काही नियम प्राचीन परंपरेने सांगितले आहेत. जरी भारतात सूतक काळ नसला तरी, वैयक्तिक शुद्धीकरणासाठी मंत्रजाप करणे शुभ मानले जाते. 'ओम नमः शिवाय' किंवा 'महामृत्युंजय' मंत्राचा मानसिक जप केल्यास ग्रहांच्या नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते. ग्रहण संपल्यानंतर स्नान करुन दानधर्म करणे फलदायी मानले जाते.

याउलट, ग्रहण काळात भोजन करणे किंवा शिजवणे टाळावे, असा सल्ला दिला जातो. विशेषतः गर्भवती महिलांनी या काळात अणकुचीदार वस्तूंचा वापर टाळून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. थोडक्यात, हे ग्रहण जुन्या विचारांचा त्याग करुन नवीन ऊर्जेकडे जाण्याची संधी असून, संयम आणि भक्तीच्या जोरावर या काळातील आव्हानांवर मात करता येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com