Mohammad Amir Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2026: "भारत वर्ल्ड कप जिंकणार नाही!" सेमीफायनलचं तिकीट पक्क करताच पाकिस्तानी खेळाडूचा जळफळाट Watch Video

Mohammad Amir Criticizes Team India: भारताच्या विजयाने आणि उपांत्य फेरीतील प्रवेशाने आमीर चांगलाच बावरुन गेला असून त्याने टीम इंडियाबाबत एक धक्कादायक भाकीत वर्तवले आहे.

Manish Jadhav

Mohammad Amir Prediction: टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाने आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखत 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजवर शानदार विजय मिळवला. अशारितीने भारताने सेमीफायनलचे तिकीट निश्चित केले. वेस्ट इंडिजने दिलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 5 गडी राखून आणि 4 चेंडू राखून हा विजय संपादन केला. या विजयामुळे संपूर्ण भारतभरात आनंदाचे वातावरण असतानाच, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याच्या पोटात मात्र गोळा आला. भारताच्या विजयाने आणि उपांत्य फेरीतील प्रवेशाने आमीर चांगलाच बावरुन गेला असून त्याने टीम इंडियाबाबत एक धक्कादायक भाकीत वर्तवले.

आमीरने भारत (India) आणि वेस्ट इंडिज यांच्यातील महामुकाबल्यापूर्वी असा दावा केला होता की, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील 'सूर्या अँड कंपनी' हा सामना हरेल. मात्र, प्रत्यक्ष सामन्यात भारतीय फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी आमीरचे हे भाकीत चुकीचे ठरवत दिमाखदार विजय मिळवला. स्वतःचे भाकीत खोटे ठरल्यामुळे चिडलेल्या आमीरने आता नवा राग आळवला.

तो म्हणाला की, "टीम इंडिया सध्या चांगला क्रिकेट खेळत नाहीये. त्यांच्या विजयाचा रथ आता थांबेल, कारण त्यांची गोलंदाजी कमकुवत होत चालली आहे. टीम इंडिया उपांत्य फेरीत ज्या संघाचा सामना करणार आहे, तो संघ फिरकी गोलंदाजी अत्यंत उत्तम खेळतो. त्यामुळे भारत या स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार नाही आणि ते टी-20 वर्ल्ड कप कधीच जिंकणार नाहीत."

मोहम्मद आमीरच्या (Mohammad Amir) या विधानामुळे सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. एकीकडे टीम इंडिया फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर संतुलित कामगिरी करत असताना, केवळ द्वेषापोटी आमीर अशी विधाने करत असल्याची टीका होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 196 धावांचे विशाल लक्ष्य गाठून भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे.

सेमीफायनलमध्ये आता भारताचा सामना इंग्लंडशी होणार असून, आमीरच्या या विधानांना टीम इंडिया मैदानात आपल्या कामगिरीने कसे उत्तर देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता तेथील माजी खेळाडू भारतीय संघाच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन आपली निराशा व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT