Pat Cummins & Mitchell Starc X
क्रीडा

IPL 2024 Auction: स्टार्कला लागली ऐतिहासिक 24.75 कोटींची बोली! एकाच तासात मोडला कमिन्सचा विक्रम

Mitchell Starc IPL Auction: मिचेल स्टार्कला आयपीएल 2024 लिलावात तब्बल 24.75 कोटींची बोली लागली आहे.

Pranali Kodre

IPL 2024 Players Auction, Mitchell Starc :

दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये इंडियन प्रीमीयर लीग 2024 स्पर्धेसाठी मंगळवारी (19 डिसेंबर) लिलाव होत आहे. या लिलावात अनेक आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू उतरले आहेत. यातील एक मिचेल स्टार्कही होता. दरम्यान, त्याच्या बोलीने इतिहास रचला आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात चांगलीच चुरस पाहायला मिळली. अखेर त्याला कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी 24.75 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले.

त्यामुळे तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. विषेश म्हणजे याच लिलावात एका तासापूर्वी म्हणजेच दुपारी 2.30 वाजल्याच्या दरम्यान स्टार्कचा संघसहकारी पॅट कमिन्सला तब्बल 20.50 कोटी रुपयांची बोली लागली होती. त्याला सनरायझर्स हैदराबादने संघात घेतले होते. त्यामुळे तो त्यावेळी सर्वात महागडा खेळडू ठरला होता.

मात्र आता, त्याच्या याच विक्रमाला साधारण तासाभरात स्टार्कने मागे टाकले आहे. त्यामुळे आता स्टार्क आणि कमिन्स हे आयपीएल लिलावातील सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.

या लिलावापूर्वी सर्वात महागडा खेळाडू ठरण्याचा विक्रम इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनच्या नावावर होता. सॅम करनला आयपीएल 2023 लिलावात 18.50 कोटी रुपयांना पंजाब किंग्सने खरेदी केले होते. त्याचा हा विक्रम आता कमिन्स आणि मग स्टार्कनेही मोडला आहे.

दरम्यान, स्टार्क हा कोलकाताचाही सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रमही पॅट कमिन्सच्या नावावर होता.  त्याला 2020 आयपीएल लिलावात 15.50 कोटी रुपयांना कोलकाता नाईट रायडर्सने संघात घेतले होते. त्यावेळी तो या संघाचा सर्वात महागडा खेळाडू होता. पण आता हा विक्रमही स्टार्कने मोडला आहे.

आठ वर्षांनी स्टार्कचे पुनरागमन

आयपीएल 2024 मधून स्टार्क तब्बल आठ वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे. त्याने आयपीएलमध्ये अखेरचे 2015 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळले होते.

त्यानंतर 2018 मध्ये तो आयपीएलमध्ये खेळणार होता, मात्र दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही. स्टार्कने आयपीएलमध्ये 27 सामने खेळले असून 34 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT