Mitchell Santner Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू ठरला 'बेस्ट फील्डर'; किंग कोहलीला सोडले मागे

World Cup 2023: क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी ही सर्व संघांची ताकद आहे, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणही सर्व संघांचे बलस्थान ठरु लागले आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी ही सर्व संघांची ताकद आहे, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणही सर्व संघांचे बलस्थान ठरु लागले आहे. विश्वचषकातही हे सर्वांना पाहायला मिळत आहे.

प्रत्येक संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून या स्पर्धेत शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हे लक्षात घेऊन ICC कडून विश्वचषक 2023 दरम्यान 6 सामन्यांनंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची निवड करण्यात आली आहे. यावेळी किवी अष्टपैलू खेळाडूची सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवड झाली आहे.

सँटनर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरला

दरम्यान, न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या क्षेत्ररक्षणाने छाप सोडली आहे. आता सँटनर विश्वचषक 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या शर्यतीत विराट कोहलीला मागे टाकून नंबर वन बनला आहे.

याआधी सहा सामन्यापूर्वी विराट कोहलीला (Virat Kohli) आयसीसीने 2023 च्या विश्वचषकातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवडले होते.

दुसरीकडे, न्यूझीलंडच्या (New Zealand) या अष्टपैलू खेळाडूने विश्वचषकात सहा सामन्यांत फक्त चार झेल घेतले आहेत, पण मैदानावर त्याचा प्रभाव जास्त आहे. सँटनरनेही क्षेत्ररक्षण करताना संघासाठी 9 धावा वाचवल्या आहेत.

याशिवाय, प्रेशर रेटिंग, चांगले थ्रो आणि रनआऊटचे प्रयत्न या प्रकारांमध्येही सँटनर पहिल्या क्रमांकावर आहे. मिचेल सँटनरला आयसीसीने 43.28 रेटिंग दिले आहे.

या यादीत जडेजा-विराटचाही समावेश आहे

एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीत सँटनरनंतर दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर दुसऱ्या स्थानावर, डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर, इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टन चौथ्या स्थानावर, रवींद्र जडेजा पाचव्या स्थानी आणि विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे.

क्षेत्ररक्षकांच्या टॉप-10 यादीत फक्त दोन भारतीय खेळाडू आहेत. याशिवाय, या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाने सर्वाधिक 44 झेल घेतले आहेत. याशिवाय संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत 44 धावा वाचवल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT