Hayley Matthews | Meg Lanning  Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: ऑरेंज कॅप लेनिंगला, तर पर्पल कॅप मॅथ्यूजला; पाहा शर्यतीत राहिलेल्या टॉप 5 जणींची लिस्ट

वूमन्स प्रीमियर लीग 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 खेळाडूंबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

Womens Premier League 2023: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला हा सामना मुंबई इंडियन्सने 7 विकेट्सने जिंकला आणि पहिल्या डब्ल्युपीएल स्पर्धेची ट्रॉफी उंचावली.

या सामन्यानंतर या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आणि सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाजही निश्चित झाली आहे. इंडियन प्रीमियर लीगप्रमाणेच डब्ल्युपीएलमध्येही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप प्रदान करण्यात आली आहे. तसेच सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप प्रदान करण्यात आली.

मेग लेनिंग ऑरेंज कॅपची मानकरी

पहिल्या डब्ल्युपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणारी मेग लेनिंग ऑरेंज कॅपची मानकरी ठरली. तिने या संपूर्ण स्पर्धेत 9 सामने खेळले असून 49.28 च्या सरासरीने 345 धावा केल्या. यामध्ये तिच्या 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 72 धावा ही तिची सर्वोच्च खेळी ठरली. तिने 345 धावा करताना 50 चौकार मारले. हा देखील एक विक्रम आहे. तसेच तिने 6 षटकार मारले.

यंदा या हंगामात लेनिंग व्यतिरिक्त अंतिम सामन्यात नाबाद 60 धावांची खेळी करणारी नतालिया स्किव्हर-ब्रंट आणि ताहलिया मॅकग्रा यांनाच 300 धावांचा टप्पा पार करता आला. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या नतालियाने 10 सामन्यांमध्ये 332 धावा केल्या. तिने ऑरेंज कॅपसाठी लेनिंगला चांगली टक्कर दिली. तसेच युपी वॉरियर्सकडून खेळणाऱ्या ताहलियाने 9 सामन्यांमध्ये 302 धावा केल्या.

हेली मॅथ्युजने जिंकली पर्पल कॅप

मुंबई इंडियन्सची अष्टपैलू क्रिकेटपटू हेली मॅथ्युजने पर्पल कॅप आपल्या नावे केली. तिने या संपूर्ण हंगामात मुंबई इंडियन्ससाठी दमदार कामगिरी करताना फलंदाजी आणि गोलंदाजीत आपले योगदान दिले. तिने अंतिम सामन्यातही 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तिच्या नावावर 10 सामन्यांमध्ये 16 विकेट्सची नोंद झाली.

तिने 12.62 च्या सरासरीने या 16 विकेट्स घेतल्या. महत्त्वाचे म्हणजे तिने एकाच सामन्यात तीन किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी चार वेळा केली. 5 धावांत 3 विकेट्स ही तिची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

दरम्यान, सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सोफी एक्लेस्टोननेही 16 विकेट्सच घेतल्या आहेत.तसेच या हंगामात एमेलिया केर, इजी वाँग आणि सायका इशाक या तिन्ही मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी प्रत्येकी 15 विकेट्स घेतल्या.

डब्ल्युपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 खेळाडू

345 धावा - मेग लेनिंग (9 सामने, दिल्ली कॅपिटल्स) (ऑरेंज कॅप)

332 धावा - नतालिया स्किव्हर-ब्रंट (10 सामने, मुंबई इंडियन्स)

302 धावा - ताहलिया मॅकग्रा - (9 सामने, युपी वॉरियर्स)

281 धावा - हरमनप्रीत कौर (10 सामने, मुंबई इंडियन्स)

271 धावा - हेली मॅथ्यूज (10 सामने, मुंबई इंडियन्स)

डब्ल्युपीएल 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाज

16 विकेट्स - हेली मॅथ्युज (10 सामने, मुंबई इंडियन्स)

16 विकेट्स - सोफी एक्लेस्टोन (10 सामने, मुंबई इंडियन्स)

15 विकेट्स - एमेलिया केर (10 सामने, मुंबई इंडियन्स)

15 विकेट्स - इजी वाँग (10 सामने, मुंबई इंडियन्स)

15 विकेट्स - सायका इशाक (10 सामने, मुंबई इंडियन्स)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT