लिओनेल मेस्सी (Lionel Messi) Dainik Gomantak
क्रीडा

कसा ही का होईना मेस्सी भारतीय जाहिरातीवर झळकला...

भारतातील बिडी पॅकेटवर मेस्सीचा (Lionel Messi) फोटो झळकलेला पाहायला मिळाला.

दैनिक गोमन्तक

रविवारी कॉपा अमेरिका (Copa America) स्पर्धेमध्ये अर्जेंटिनाने (Argentina) ब्राझीलला (Brazil) 1- 0 अशा गोल फरकाने हरवले. आणि या विजयाचा मानकरी ठरला तो म्हणजे अर्जेंटिनाचा सुप्रसिद्ध व अनुभवी फुटबॉलपटू(Football) लिओनेल मेस्सी (Lionel Messi). जगातील अव्वल फुटबॉलपटू मध्ये गणल्या जाणाऱ्या मेस्सीला कोण ओळखत नसेल ? अशाच या जगप्रसिद्ध मेस्सीला आपल्या जाहिराती मध्ये घेण्यासाठी कितीतरी मोठ मोठ्या कंपन्या चढाओढ करत असतात आणि त्याला जाहिरातीत घेण्यासाठी अव्वाच्या सव्वा किंमत मोजतात.

आता भारतात जी गोष्ट कोणाला जमली नाही, तीच गोष्ट एका बिडी कंपनीने करून दाखवली, अर्थातच भारतातील बिडी पॅकेटवर मेस्सीचा फोटो झळकलेला पाहायला मिळाला. आणि नेमका हाच चर्चेचा विषय बनला. आणि त्या बिडी पॅकेटचा फोटो बराच व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या, ज्यामध्ये काही जणांनी मेस्सीचे कौतुक केलं तर काहींनी त्या जाहिरात बनवण्यामागे असणाऱ्या व्यक्तीच्या सुपीक मेंदूतून निघालेल्या भन्नाट कल्पनेचे कौतुक केलं. पण मेस्सीला मात्र काय वाटत असावे याविषयी हे पाहणे मजेशीर असेल.

पण एकंदरीत हे जे काही घडलं ते फार मजेशीर मात्र नक्कीच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT