जगातीक कसोटीच्या(WTC Final) अंतिम सामन्यानंतर पुरेशी काळजी घेऊनही भारतीय क्रिकेट संघातील(Indian Cricket Team) एक खेळाडूचा कोविड 19(Covid19) अवहाल पॉजिटीव्ह आला आहे .
जागतिक कसोटी क्रिकेट सामन्यानंतर भारतीय संघाला २० दिवसाची सुटी होती. आणि याच सुट्यांचा पुरेपूर आनंद लुटताना अनेकदा भारतीय खेळाडू लंडनमध्ये(London) फिरताना दिसत होते . काही खेळाडूंनी(EuroCup2020) तर युरो फुटबॉल सामन्याचाही आनंद घेतला . मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विंबल्डनच्या अंतिम सामन्यालाही उपस्थिती लावली त्याचबरोबर फिरकी गोलंदाज अश्विननेही एक दिवस विंबल्डनला हजेरी लावली होती.
आणि सूत्रांच्या माहितीनुसार रिषभ पंत(Rishabh Pant) पॉझिटिव्ह असल्याचे समजत आहे.
या सुट्ट्या संपल्यानंतर हे खेळाडू जेंव्हा बायो बबलमध्ये परतले त्यावेळेस या सर्वांची चाचणी करण्यात आलीआणि या चाचणीनंतरच संघातले दोन खेळाडू पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. मात्र, दुसऱ्या चाचणीत एक खेळाडू निगेटिव्ह आला. मात्र दुसऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. हा खेळाडू आता भारतीय संघासोबत डरहॅमला प्रवास करणार नाही आणि तो पूर्णवेळ विलगीकरणात असणार आहे.
आणि या गोष्टीची पुष्टी आता बीसीसीआयने देखील केली आहे बीसीसीआयने संघातील एक खेळाडू पॉजिटीव्ह असल्याचे सांगितले आहे मात्र खेळाडूचे नाव सांगण्यास मात्र बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नकार दिला आहे.
मात्र तरीही सूत्रांच्या माहितीनुसार यष्टिरक्षक रिषभ पंत पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. तो भारतीय संघासोबत डरहॅमला जाणार नाही, असेही सूत्राने सांगितले. पंत इंग्लंड वि. जर्मनी या फुटबॉल सामन्यासाठी मैदानात उपस्थित होता. चाहत्यांबरोबर काढलेले फोटोही त्याने ट्विटरवरून शेअर केले होते.आणि याचमुळे पंतला ही लागण झाली असल्याचे समोर येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.