Kenya | World Cup 1996 
क्रीडा

World Cup 2023: पुणे, वर्ल्डकप अन् मोठा उलटफेर! कहाणी 27 वर्षांपूर्वीच्या सामन्याची

World Cup Matches at Pune: तब्बल 27 वर्षांनंतर पुण्यामध्ये वर्ल्डकपचे सामने होणार असल्याने 27 वर्षांपूर्वीच्या एका सामन्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Pranali Kodre

World Cup Matches at Pune:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसा रंगत चालली आहे. गेल्या दोन आठवड्यात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. तसेच मोठे उलटफेरही झाले. पण यजमान भारतीय संघाने मात्र आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

आता भारतीय संघाला या स्पर्धेतील चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे. दरम्यान पुण्यात तब्बल 27 वर्षांनंतर वनडे वर्ल्डकपचा सामना रंगणार आहे.

यापूर्वी 1996 साली पुण्यातील नेहरु स्टेडियममध्ये वर्ल्डकप सामना झाले होते. दरम्यान आता 27 वर्षांनंतर पुण्यात पुन्हा वर्ल्डकप सामना होत असलेल्याने चाहत्यांसाठी एका 27 वर्षांपूर्वीच्या सामन्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. हा सामना झालेला केनिया आणि वेस्ट इंडिज संघात.

या सामन्यात नवख्या केनियाने बलाढ्य आणि 2 वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला जोरदार पराभवाचा धक्का दिला होता. विशेष गोष्ट अशी की 1996 वर्ल्डकपपासूनच केनियाने वनडे क्रिकेटमध्ये पाऊल टाकले होते. म्हणजेच 1996 आधी केनिया संघ एकही आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला नव्हता.

वेस्ट इंडिजविरुद्ध केनिया वर्ल्डकपमधीलच नाही, तर त्यांच्या क्रिकेट इतिहासातीलही पाचवाच वनडे सामना खेळत होते.

त्याचबरोबर त्यावेळी वेस्ट इंडिज संघात रिची रिचर्डसन, ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल, इयान बिशप, कर्टली अँब्रोस, कर्टनी वॉल्श असे दिग्गज खेळाडू वेस्ट इंडिज संघात होते. असे असतानाही केनियाने वेस्ट इंडिज संघाला पराभवाचा धक्का दिला. केनियाचे त्यावेळी प्रशिक्षक होते हनुमंत सिंग.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू इंद्रजीत कामठेकर यांनी माहिती दिली की त्यावेळी ते त्या सामन्याच बॉल बॉय होते आणि त्यांनी त्या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिज संघासाठी नेट्समध्ये गोलंदाजी देखील केली होती.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी वेस्ट इंडिज संधाला पूर्ण विश्वास होता की ते केनियाविरुद्ध जिंकली. ब्रायर लारा यांनी तर नेट्समधये सरावही केला नव्हता. असे असले तरी, काही खेळाडूंनी मात्र गंभीरतेने सराव केला होता.

दरम्यान, त्यावेळी अनेक चाहत्यांनी विचार केला असेल की सामना झटपट संपल्यानंतर पुढचा सामना पाहाता येईल. मात्र, या सामन्याने सर्वांनाच चकीत केले.

असा झाला सामना

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी जाळे टाकण्यास सुरुवात केली, ज्यात केनियाचे फलंदाज अडकत गेले. त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या.

दरम्यान, केनियाकडून थॉमस ओडोयो(24), हितेश मोदी (26) आणि स्टीव्ह टिकोलो (29) यांनाच 20 धावांचा टप्पा पार करता आला. पण वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी विकेट्स घेण्याबरोबरच तब्बल 37 धावा अतिरिक्त दिल्या होत्या. त्यामुळे केनियाच्या 49.3 षटकात सर्वबाद 166 धावा झाल्या होत्या.

वेस्ट इंडिजकडून कर्टनी वॉल्श आणि रॉजर हार्पर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या, तर कर्टली अँब्रोसने 2 विकेट्स घेतल्या होत्या.

यानंतर वेस्ट इंडिज सहज जिंकेल असे वाटले होते. मात्र, वेस्ट इंडिजसाठी सर्व फासे उलटे पडले आणि त्यांना 100 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. केनियाचा कर्णधार मौरिस ओडुंबेने पुढे होत महत्त्वाचे योगदान दिले.

मार्टिन सुजी आणि राजब अली यांनी वेस्ट इंडिजला सुरुवातीचे धक्के दिले होते. अलीने कर्णधार रिची रिचर्डसन आणि ब्रायन लारा यांना माघारी धाडले होते, शेर्विन कॅम्बेलला सुजीने बाद केले होते. त्यानंतर मधली फळी ओडुंबेने खिळखिळी केली. त्याने शिवनारायण चंद्रपॉल, जिमी ऍडम्स आणि रॉजर हार्पर यांना माघारी धाडले. त्यामुळे वेस्ट इंडिजची अवस्था 7 बाद 78 धावा अशी दयनीय झाली.

यातून वेस्ट इंडिड संघ सावरला नाही. त्यात त्यांचे केथ अर्थर्टन आणि कर्टली अँब्रोस धावबाद झाले. अखेरच्या दोन विकेट्स असिफ करिम आणि अली यांनी घेतल्या. अखेर वेस्ट इंडिज संघ 35.2 षटकात अवघ्या 93 धावांवर सर्वबाद झाला.

या सामन्यात ओडुंबेने 10 षटकात अवघ्या 15 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला. दरम्यान, त्याच्याशिवाय अलीनेही 3 विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना वेस्ट इंडिजने 73 धावांनी गमावला होता.

त्या सामन्याच्या आठवणी...

या सामन्यासाठी सामनाधिकारी म्हणून मन्सूर अली खान पतौडी काम पाहात होते, तर खिझेर हयात पंच होते. हे दोघेही सामन्याच्या मध्यरात्री पुण्यात पोहचले होते, कारण त्याआधी केनिया आणि झिम्बाब्वे यांच्यात दोनदिवस आधी पटनाला झालेल्या सामन्यातही ते काम पाहात होते.

या सामन्याची आणखी एक खास गोष्ट अशी की त्यावेळी पुण्यात सिंबॉयसिस इंस्टीट्यूटमध्ये शिकणाऱ्या केनियाच्या 300 विद्यार्थ्यांनीही हा सामना स्टेडियममध्ये बसून पाहिला होता.

इतकेच नाही, तर या सामन्यात जो ओडुंबे सामनावीर ठरलेला, त्याला काही वर्षांपूर्वी लाराने स्वाक्षरी देण्यास नकार दिला होता. या विजयानंतर केनियाला 2 हजार युरो बक्षीसही मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT