World Cup 2023: अफगाणिस्तानचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला 'हा' कारनामा

England vs Afghanistan: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अफगाणिस्तानने इंग्लंडला 69 धावांनी पराभवाचा धक्का दिला.
Afghanistan Cricket Team
Afghanistan Cricket TeamX/ICC
Published on
Updated on

Afghanistan Historical Win against against in ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी अफगाणिस्तानने मोठा उलटफेर करत गतविजेत्या इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला. दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने 69 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानचा हा विजय ऐतिहासिक ठरला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा अफगाणिस्तानचा इंग्लंडविरुद्धचा पहिलाच विजय आहे. तसेच वनडे वर्ल्डकपमधील केवळ दुसरा विजय आहे. अफगाणिस्तानने यापूर्वी वनडे वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंडविरुद्ध 2015 वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला होता.

याशिवाय अफगाणिस्तानची वनडे वर्ल्डकपमधील पराभवाची मालिकाही अखेर संपली आहे. वर्ल्डकपमध्ये तब्बल 14 पराभवांनंतर अफगाणिस्तानला विजय मिळला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सलग पराभव स्विकारणाऱ्यां संघांच्या नकोशा विक्रमात दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

Afghanistan Cricket Team
World Cup 2023: जो रुटची फिल्डिंगमध्ये कमाल! मोहम्मद कैफच्या 20 वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी

या विक्रमाच्या यादीत सलग 18 पराभवांसह झिम्बाब्वे अव्वल क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ स्कॉटलंड आणि अफगाणिस्तान आहे. स्कॉटलंडनेही 1999 ते 2015 दरम्यान सलग 14 पराभव स्विकारले आहेत.

इंग्लंडच्या फलंदाजांना मिळाले फिरकीचे आव्हान

रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या 10 विकेट्सपैकी 8 विकेट्स अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने पहिल्यांदाच 8 विकेट्स फिरकी गोलंदाजांविरुद्ध गमावल्या.

इंग्लंडचा संघ अफगाणिस्तानने दिलेल्या 285 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 40.3 षटकात 215 धावांत सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एकट्या हॅरी ब्रुकने 66 धावांची झुंज दिली.

Afghanistan Cricket Team
World Cup 2023: अफगाणिस्तानने केला मोठा उलटफेर! गतविजेत्या इंग्लंडला चारली पराभवाची धूळ

अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच मोदम्मद नबीने 2 विकेट्स घेतल्या. तसेच फझलहक फारूकी आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. मुजीब, राशिद आणि नबी या तीन फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडला चांगलाच संघर्ष करायला लावला.

तत्पुर्वी अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताान 49.5 षटकात सर्वबाद 284 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून रेहमनुल्लाह गुरबाजने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. तसेच इक्रम अलीखिलने 58 धावांची खेळी केली. तसेच राशिद खानने 23 आणि मुजीब उर रेहमानने 28 धावांची खेळी केली.

इंग्लंडकडून आदिल राशिदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मार्क वूडने 2 विकेट्स घेतल्या. याबरोबरच रिस टोपली, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जो रुट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com